Join us  

'आई कुठे काय करते' फेम अश्विनी महांगडेची पोस्ट व्हायरल, म्हणाली, "त्यांना समजण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 5:07 PM

अश्विनीने तुळापूरच्या शौर्यपीठ येथील एक फोटो शेअर केला आहे

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) हिने नुकतीच केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. ती नेहमीच तिच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अनेक सामाजिक मुद्द्यांवरही ती बोलते. आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत छत्रपतींबद्दलचा आदर व्यक्त केला. अश्विनी महांगडेने एक फोटो शेअर करत ही पोस्ट केली आहे.

अश्विनीने तुळापूरच्या शौर्यपीठ येथील एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने गुलाबी साडी नेसली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन करतानाचा आणि हार अर्पण करतानाचा हा फोटो आहे. तिने लिहिले,"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा....छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले. त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते. "शौर्यपीठ" कथा सांगते राजाची. नुसते त्या भूमीत उभे राहिले तर डोळे पाणावतात. ही भावना त्यांनाच समजू शकते जे एकदा तरी तिथे गेले आहेत.

अश्विनी महांगडेच्या या पोस्टचं सगळेच कौतुक करत आहेत. छत्रपतींप्रती तिच्या मनात असलेला आदर तिने कायम व्यक्त केला आहे. सध्या अश्विनी आई कुठे काय करते मालिकेत अनघा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. 

टॅग्स :अश्विनी महांगडेआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकारमराठी अभिनेतासोशल मीडिया