छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अभिच्या लग्नाची गडबड सुरु आहे. अखरे अभिषेक आणि अनघा लग्नगाठ बांधली आहे. आतापर्यंत देशमुखांच्या घरात हळद, संगीत, मेहंदी असे सारे सोहळे दिमाखात पार पडले. लग्नाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. विशेष म्हणजे यावेळी घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदात असल्याचं पाहायला मिळालं. या विवाहसोहळ्यात संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात दिसतेय. अनघा आणि अभिषेकचा पारंपरिक पोशाखात सुंदर दिसतायेत.
मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले साकारते आहे. मधुराणी ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री असून जाहिरात क्षेत्रापासून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा प्रवास रुपेरी पडद्याकडे झाला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केले आहे.तिने 'आई कुठे काय करते' या मालिकेतून जवळपास १० वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक केले आहे. याबद्दल मधुराणीने मुलाखतीत सांगितले की, इतका मोठा ब्रेक घेण्यामागे कारणदेखील खास आहे. तिला ६ वर्षांची मुलगी आहे आणि तिच्या जन्मानंतर तिला वेळ देता यावा म्हणून तिने मोठा ब्रेक घेतला होता.