Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझं शरीर आणि माझे कपडे..." बिकीनीवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:53 IST

लोकप्रिय अभिनेत्रीने तिला बिकिनी घातल्याने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि टीव्ही अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आरती आपल्या बोल्ड फोटोना घेऊन नेहमीच चर्चेत असते. आरतीचा फोटोंमधील अंदाज देखील तिच्या चाहत्यांना आवडत असतो. अलीकडेच आरतीने बिकिनीमधील काही फोटो शेअर केले. पण, यावेळी तिच्या काही फोटोंमुळे ती ट्रोलिंगचा शिकार झाली. 

आरती सिंहने बिझनेसमन दीपक चौहानसोबतचे थायलंड व्हॅकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आरतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे. आरतीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीला तिने हे फोटो डिलीट केले, पण काही वेळानंतर तिने पुन्हा पिंक बिकिनीतील फोटो शेअर करत ठाम भूमिका मांडली.

आरतीने लिहिलं, "माझं आयुष्य, माझे नियम. माझं शरीर आणि माझे कपडे ही माझी स्वतःची निवड आहे. आपण नेहमी विचार करत बसतो की लोक काय म्हणतील. पण एक दिवस असं वाटतं की, जे मनाला हवं होतं तेच करायला हवं होतं. ज्या लोकांबद्दल आपण विचार करतो, ते आपल्याला ओळखतही नाहीत".

आरतीने पुढे सांगितलं की, मागील वेळी बिकिनी फोटो पोस्ट केल्यानंतर काही लोकांनी तिला अनफॉलो केलं होतं, ज्याचा तिच्यावर परिणाम झाला आणि तिने फोटो डिलीट केले. मात्र, काही दिवसांनी तिची जवळची मैत्रीण शेफालीच्या निधनानंतर तिला आयुष्याची अनिश्चितता जाणवली. 

आरती म्हणाली, "आपण जे खरंच आपल्याला आनंद देतं तेच का करू नये? मी कुणाला दुखावत नाही. जर तुम्हाला आवडत नसेल, तर अनफॉलो करा. कमेंट्समधून फक्त तुमचे संस्कार दिसतात, माझ्या कपड्यांमधून नाही".  दरम्यान आरती सिंह ही बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची भाची आहे. तिने २००७ साली मायका या मालिकेतून करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Arti Singh's bold response to trolls on her bikini photos.

Web Summary : Actress Arti Singh faced trolling for her bikini photos from a Thailand vacation. Initially, she deleted the photos but later reposted them with a strong message about body positivity and personal choice, emphasizing that people's opinions shouldn't dictate her actions.
टॅग्स :आरती सिंग