‘बिग बॉस’मध्ये आवामची मने जिंकणारी अर्शी खान ‘बिग ब्रदर’मध्येही दाखविणार जलवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:11 IST
अर्शी खान आता ‘बिग ब्रदर’ या शोमध्ये सहभागी होणार आहे. बिग बॉसमधून आवामची मने जिंकणारी अर्शी बिग ब्रदरमध्ये काय जलवा दाखविणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
‘बिग बॉस’मध्ये आवामची मने जिंकणारी अर्शी खान ‘बिग ब्रदर’मध्येही दाखविणार जलवा!
सलमान खान होस्ट असलेल्या ‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोच्या सीजन ११ मध्ये आपले जलवे दाखविणारी अर्शी खान आता ‘बिग ब्रदर’ या शोमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या शोसाठी ती खूप एक्सायटेड असल्याचे समजते. याबद्दल अर्शीनेच खुलासा केला असून, तिने म्हटले की, ‘हा शो खूपच मजेशीर आणि चांगला अनुभव देणारा असेल. ‘बिग बॉस’मुळे मी ‘बिग ब्रदर’ या शोमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. कारण शोमध्ये काय करायचे अन् काय नाही करायचे याबद्दलची पूर्ण व्यूहरचना मी आखली आहे.’पुढे बोलताना अर्शी खानने म्हटले की, ‘बिग ब्रदर’ या शोमध्ये अनोळखी व्यक्तींबरोबर मी भारताचे एकप्रकारे प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने ‘बिग ब्रदर’च्या पाचव्या सीजनमध्ये (२००७) सहभाग घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली होती. याठिकाणी ती वर्णभेदाला बळी पडली होती. शिवाय तिने या सीजनचा किताबही आपल्या नावे केला होता. आता अर्शी खान काय जलवा दाखविणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ">http:// दरम्यान, अर्शी खान बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली होती. ती प्रेक्षकांची फेव्हरेट स्पर्धक म्हणून समोर आली. घरात अर्शीचे जलवे चर्चेचा विषय ठरले होते. तिने आपल्या बोल्ड अदांनी घरातील इतर स्पर्धकांचेही चांगलेच मनोरंजन केले. वास्तविक अर्शीला बिग बॉस या शोचा किताब आपल्या नावे करता आला नाही, परंतु तिने ज्या पद्धतीने घरात आपला जलवा दाखविला तो कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहील यातही काही शंका नाही.