Join us

अर्शी खानला एकदा नव्हे तर दोनदा झाली सेक्स रॅकेटमध्ये अटक; गोवा-पुणे कनेक्शन आले समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 18:52 IST

सलमान खानच्या ‘बिग बॉस-११’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये मॉडेल तथा अभिनेत्री अर्शी खान पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरत आहे. ...

सलमान खानच्या ‘बिग बॉस-११’ या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोमध्ये मॉडेल तथा अभिनेत्री अर्शी खान पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरत आहे. हितेन तिवारीसोबत खुल्लम खुल्ला फ्लर्ट करणाºया अर्शीने आतापर्यंत घरातील सर्वच सदस्यांशी वाद घातला आहे. त्यामुळे ती शोच्या पहिल्या दिवसापासूनच प्रत्येक एपिसोडमध्ये चर्चेत राहत आहे. खरं तर बिग बॉसमध्ये प्रवेश करण्याअगोदरच अर्शी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आहे. आता तर तिचा स्पेशल नाइटी लूक सर्वत्र पसंत केला जात आहे. त्यातच शुक्रवारी प्रियांक शर्माची घरात पुन्हा एंट्री झाल्यानंतर तिचे काही कायदेशीर प्रकरणे बाहेर आल्याने सध्या अर्शी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. होय, गेल्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये अर्शी खान आणि सपना हिच्यात सुरू असलेल्या भांडणात प्रियांकने अशी काही ठिणगी टाकली आहे, ज्यामुळे अर्शीचे खरे रूप समोर आले आहे. होय, प्रियांकने सपनाला म्हटले की, तू अर्शीला केवळ ‘गोवा आणि पुणे ऐवढेच म्हण.’ सपनानेदेखील तसेच काहीसे म्हणत अर्शीला डिवचले अन् तिच्या डोळ्यातून पटापटा अश्रू टपकायला लागले. आता तुम्ही म्हणाल की, ‘गोवा आणि पुणे’ नेमके कनेक्शन काय? तर आॅक्टोबर २०१६ मध्ये पुणे मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, ‘पुणे सिटी पोलिसांनी एका सेक्स रॅकेट प्रकरणात अर्शीला अटक केली होती. अर्शी व्यतिरिक्त विपुल दहल नावाच्या एका व्यक्तीला (हा अर्शीचा एजंट असल्याचे म्हटले जात होते) अटक केली होती. मात्र अटकेच्या एक दिवसानंतरच अर्शीने पोलिसांना आरोप लावत म्हटले होते की, पोलिसांनी स्वत:ला वाचविण्यासाठी मला या प्रकरणात गोवले. पुणे मिरर रिपोर्टनुसार, अर्शीच्या टीमने सांगितले होते की, पोलिसांनी हॉटेलमधील त्याच्या रूममध्ये रेड करीत तिच्याकडे पैशांची मागणी केली. जेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिला सेक्शुअल फेव्हर बोलण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर अर्शी गोव्यातील एका सेक्स रॅकेटमध्येही फसली होती. मात्र त्यावेळीदेखील अर्शीने पोलिसांना तिचा याच्याशी काहीच संबंध नसल्याचे समजावून सांगितले होते. त्यानंतर ती मुंबईत आली होती. काही दिवसांपूर्वीच अर्शी तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिला चांगल्या पद्धतीने ओळखणारी मॉडेल आणि अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने तिचा पर्दाफाश केला होता. गहनाने दावा केला होता की, अर्शी खानने तिच्या वयाबद्दल शिक्षणासह प्रत्येक गोष्टीत खोटं सांगितले आहे. गहनाने आरोप केला होता की, अर्शीचे वय ३२ ते ३३ वर्षे इतके आहे. शिवाय ती ग्रॅज्युएटदेखील नाही. गहना अर्शी खानची स्कूल फ्रेंड राहिली आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गहानाने म्हटले होते की, अर्शी खानवर दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. ज्यापैकी दोन गुन्हे पाकिस्तानात, चार गुन्हे महाराष्टÑात, तर चार देशांतील अन्य भागांत दाखल आहेत. खरं तर शोमध्ये बोल्ड अंदाजात बघावयास मिळणारी अर्शी वास्तविक जीवनातही प्रचंड बोल्ड आहे. अर्शीने तामिळ आणि तेलगू चित्रपटात काम केले आहे. तिने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याच्याबरोबर संबंध असल्याचेही वारंवार सांगितले आहे. यामुळे बºयाचदा ती वादाच्या भोवºयातही सापडली आहे. मधल्या काळात तिने शाहिदसोबत कुठलेही संबंध नसल्याचे सांगितले होते. परंतु आता पुन्हा ती त्याच्यासोबत संबंध असल्याचे सांगत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतरही तिने याबाबतचा उल्लेख केला होता.