Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबी साडी अन्...; भावाच्या लग्नात करवलीची हवा, अर्जुन तेंडुलकरच्या विवाहसोहळ्यात फक्त साराचीच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:24 IST

अर्जुन-सानिया ५ मार्चला लग्नबंधनात अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र अर्जुन तेंडुलकरची बहीण आणि सचिनची लेक साराने सगळी लाइमलाइट लुटली. 

Arjun Tendulkar And Saaniya Chandhok's Wedding : क्रिकेट जगतातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अर्जुन-सानिया ५ मार्चला लग्नबंधनात अडकले आहेत.  मुंबईतील द सेंट रेजिस हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.  क्रिकेट, राजकारण आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र अर्जुन तेंडुलकरची बहीण आणि सचिनची लेक साराने सगळी लाइमलाइट लुटली. 

अर्जुनच्या लग्नात सारा करवली बनून मिरवली. साराने खाल गुलाबी रंगाची साडी नेसली होती. डिझायनर साडीत तिचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं. साराने खड्यांचे दागिने घालत खास लूक केला होता. गळ्यात मोठा हार, कानात झुमके आणि डोक्यावर बिंदी असा साजश्रृंगार करत ती नटली होती. हातावरच्या मेहेंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अर्जुनच्या लग्नातील साराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अर्जुन-सानियाचा लूक

अर्जुन आणि सानिया दोघांनी लग्नासाठी लाल रंगातील आउटफिटला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले.  अर्जुन याने लग्नात लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. तेंडुलकरांची सून सानिया हिने लाल रंगातील साडीसह अगदी परफेक्ट वेडिंग लूक परिपूर्ण केला होता. लेकाच्या लग्नात सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनीही पारंपारिक अंदाजतील खास लूकनं लक्षवेधून घेतले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pink Saree Steals the Show at Arjun Tendulkar's Wedding

Web Summary : Arjun Tendulkar married Saaniya Chandhok in Mumbai. Sister Sara Tendulkar, as a bridesmaid, wore a pink saree, captivating everyone. Sachin and Anjali Tendulkar also graced the occasion with traditional attire. Arjun and Saaniya wore red outfits for the wedding.
टॅग्स :सारा तेंडुलकरअर्जुन तेंडुलकर