Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या मातीतले रांगडे गडी अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 22:40 IST

शरीरयष्टीने सर्वांना घायाळ करणारे वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल यांची 'बिग बॉस मराठी ५'मध्ये एन्ट्री झालीय

'बिग बॉस मराठी ५' ची ग्रँड प्रीमीयर सुरु आहे. आतापर्यंत घरात १० स्पर्धकांची एन्ट्री झालीय. आता घरात ११ वा आणि १२ वा स्पर्धक दाखल झाला आहे. हे स्पर्धक आहेत अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण. अरबाज-वैभव दोघांनीही त्यांच्या सिक्स पॅक्स बॉडीचं प्रदर्शन करुन गाण्यावर डान्स केला. अरबाज-वैभव यांच्या एन्ट्रीचं आणि बॉडीचं रितेश देशमुखने चांगलंच कौतुक केलेलं दिसलं.

अरबाज - वैभवची जोडी झक्कास

अरबाज-वैभव या दोघांनीही विशेष अंदाजात 'बिग बॉस मराठी ५' मध्ये शानदार एन्ट्री घेतली. दोघांचा हॉट अवतार पाहून घरात दाखल झालेली दहावी सदस्य निक्की तांबोळी क्लीन बोल्ड झालेली दिसली. वैभव चव्हाणला आपण मन झालं बाजिंद मालिकेत पाहिलंय. तर अरबाज हिंदी शो स्प्लीट्सविलामध्ये सहभागी झाला होता. महाराष्ट्राच्या मातीतील ही रांगडी जोडी 'बिग बॉस मराठी ५'मध्ये काय धुमाकूळ घालणार हे पाहायचं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुख