Join us  

Apurva Nemlekar : 'सगळे लग्न करत आहेत अन् मी...', बिग बॉस फेम अपूर्वा नेमळेकरची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:22 AM

व्हॅलेंटाईन वीक सुरु असतानाच अपूर्वाच्या पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

Apurva Nemlekar : बॉलिवूड असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री सध्या सगळीकडेच लग्नाचे वारे वाहत आहेत. कोणी प्रेमाची कबूली देतंय तर कोणी थेट लग्नबंधनात अडकत आहेत. त्यातच आता व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा आठवडा सुरु आहे. त्यामुळे जे सिंगल आहेत अशा लोकांचं दु:ख काय असतं हे बिग बॉस फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने व्यक्त केलंय. तिने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. 

'मराठी बिग बॉस 4' मध्ये रनर अप ठरलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्येच तिने सिंगल असल्याची खंत व्यक्त केली आहे. पण ही पोस्ट काही गंभीर नाही तर विनोदी आहे. तिने एक रील शूट केले आहे. यामध्ये ती म्हणते, ' माझे सगळे मित्र मैत्रिणी एकतर लग्न करत आहे तर कोणी प्रेग्नंट आहे. आणि मी इथे कॉफी घेतीए ते पण माझ्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी.' सर्व सिंगल लोकांना तिने हे रील समर्पित केलं आहे. बाहेरुन कितीही हसत असलो तरी मनात खूप आरडाओरडा सुरु आहे असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे. 

चाहतेही तिच्या या पोस्टवर खळखळून हसत आहेत. सर्व सिंगल लोकांना तर तिचं हे रील नक्कीच पटलंय. बिग बॉस मराठीचाच सदस्य आणि तिचा मित्र त्रिशूल मराठेसोबत तिने हे रील केलं आहे. 'तुमची जोडी छान आहे लग्न करा' अशा कमेंट्सही चाहत्यांनी अपूर्वाच्या या पोस्टवर केल्या आहेत. 

अपूर्वा बिग बॉस मराठी ४ मुळे घराघरात पोहोचली. याआधी ती 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंता या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली होती. बिग बॉस मध्येही तिने अंतिम २ पर्यंत मजल मारली. मात्र शेवटी ठाण्याचा अक्षय केळकर विजेता ठरला.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरइन्स्टाग्रामव्हॅलेंटाईन वीकरिलेशनशिप