Join us

'अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पी साजरी करणार लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 19:13 IST

अप्पी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करणार आहेत.

अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे, ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. ही  मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. अप्पी अर्जुनचं लग्न झाल्यानंतर मालिकेत नवा वळणं आलं आहे. अर्जुन अप्पीला कलेक्टर बनवण्यासाठी तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहून तिला प्रोत्सहन देणार आहे, आणि त्याचा ठाम विश्वास आहे अप्पी नक्की कलेक्टर बनणार. 

अप्पीचा कलेक्टर बनण्याचा प्रवास सुद्धा सुरु झालाय आणि यात तिला अर्जुनची साथ मिळतेय, लवकरच मालिकेत अप्पी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करताना आपण पाहणार आहोत, हलव्याचे दागिने घालून दोघे सजलेले आपण पाहू शकणार आहोत, तसेच आपल्या आवडत्या राणादा आणि अंजलीबाईची सुद्धा लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी होणार ‘होम मिनिस्टर’ च्या १ तासाच्या विशेष भागाच्या निमित्ताने.

तेव्हा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि  पाहायला विसरू नका 'होम मिनिस्टर' मकरसंक्रांत विशेष भाग १५ जानेवारी संध्या. ६ वा. आणि 'अप्पी आमची कलेक्टर' संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर. 

  

टॅग्स :झी मराठी