Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अप्पी आमची कलेक्टर'मालिकेत नवा ट्विस्ट, स्मिताच्या लग्नात होणार सरकारांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 15:38 IST

स्मिताच्या लग्नाची जोरदार धामधूम चालू आहे. खूप दिवसांनी घरात मोठ्ठ कार्य असल्याने सगळेच खुश आहेत, पण.....

अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही. पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन अप्पी कलेक्टर झाली आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं असून हि मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या येत्या महाएपिसोड च्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल, स्मिताच्या लग्नाची जोरदार धामधूम चालू आहे. खूप दिवसांनी घरात मोठ्ठ कार्य असल्याने सगळेच खुश आहेत. अप्पी आणि अर्जुन लग्नासाठी शॉपिंग करतात पण अप्पीलाच सगळा खर्च आणि सगळा भार तिच्यावरच पडतोय याची कुठेतरी अर्जुनला रुखरुख लागलेय. पण आप्पीला माझ्या पगाराचा याहून चांगला उपयोग आजवर झाला नाहीये असं वाटतंय.

 स्मिताला मेहेंदी काढली जातेय आणि घरी संगीताचा कार्यक्रम होतोय,  सगळे खुश आहेत पण सुजय मात्र भेदरलेला आणि शांत शांत आहे, या मागे नक्की काय कारण असेल? स्मिताच्या लग्नात सरकारांची एन्ट्री स्मिताचं लग्न सुखरूप पार पडेल? सुजय काय नवीन गोंधळ घालेल ?  या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी हा महाएपिसोडमध्ये नक्की मिळतील. 

टॅग्स :झी मराठी