छोट्या पडद्यावर सध्या तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे अनुपमा (Anupama). सध्या या मालिकेत अनेक रंजकदार वळण येत आहेत. यामध्येच आता अनुपमा आणि अनुज लग्नगाठ बांधणार आहेत. विशेष म्हणजे वनराजच्या नाकावर टिच्चून ही जोडी लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेची जोरदार चर्चा सुरु आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अनुपमा नववधूच्या वेशात दिसत असून अनुजदेखील नवरदेवाच्या पोशाखात तयार उभा आहे. त्यामुळे ही जोडी आता लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज असल्याचं या व्हिडीओवरुन दिसून येत आहे. इतकंच नाही तर ही जोडी वनराजसमोर लग्न करणार आहेत.
अनुपमा या मालिकेच्या सेटवरील काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून अनुपमा व अनुज गुजराती पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. यामध्ये अनुपमाने व्हाइट अॅण्ड रेड कलरचा लेहंगा परिधान केला आहे.
दरम्यान, अनुज आणि अनुपमाचं लग्न होत असताना या लग्नसोहळ्याला वनराजदेखील हजेरी लावतो. काव्याच्या सांगण्यावरुन वनराज या लग्नात सहभागी होतो. त्यामुळे आता वनराजसमोर अनुज अनुपमाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहे. परंतु, मनातून नाराज असलेला वनराज या सोहळ्या काही विघ्न आणणार का? तो हे लग्न होऊ देईल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.