Join us

किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:18 IST

फिल्टर की प्लास्टिक सर्जरी?, अंकिताचे फोटो पाहून नेटकरी करतायेत ट्रोल

'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande). मध्यंतरी ती 'बिग बॉस' मुळे चर्चेत आली होती. सध्या अंकिता 'लाफ्टर शेफ्स' कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. बिग बॉसमुळे अंकिता-विकीची जोडी खूप गाजली होती. लाफ्टर शेफ्समध्येही ते दोघं दिसत आहेत. अंकिताच्या सौंदर्याचीही स्तुती करावी तितकी कमीच आहे. अस्सल मराठमोळं असं तिचं सौंदर्य आहे. मात्र नुकतेच तिने पोस्ट केलेले फोटो पाहून चाहते अवाक झाले आहेत.

अंकिता लोखंडेने लाल रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये फोटो पोस्ट केलेत. यात तिचे मोकळे कुरळे केस विखुरलेले दिसत आहेत. तिने या लूकमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. कधी तिने फोनवर बोलण्याची पोज दिली आहे तर कधी ती मेकअप करताना दिसत आहे. अंकिताचा चेहरा यात अगदीच विचित्र दिसत आहे. तिने बरेच फिल्टर लावल्यासारखा हा लूक आहे. तिचा चेहरा पाहून चाहतेही घाबरले आहेत. 

अंकिताचे हे फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 'प्लास्टिक सर्जरी?', 'एडिटिंग चुकलं आहे', 'असे भुतासारखे केस का केले आहेत?',   'तू भारतीय आहेस उगीच कोरियन बनायचा प्रयत्न करु नको', 'मायकल जॅक्सन सारखी दिसत आहेस', 'सॉरी, पण खूप वाईट दिसत आहेस' अशा अनेक कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत.

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकारट्रोल