Join us

अंकिता लोखंडेवर घरातून बाळासाठी प्रेशर, प्रेग्नंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली- "मी आता थकलीये पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 10:50 IST

गेल्या काही दिवसांपासून अंकिता गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात अंकितानेच लाफ्टरशेफच्या सेटवर "मी प्रेग्नंट आहे" असं म्हटलं होतं. आता त्याबाबत अभिनेत्रीने खुलासा करत प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे टीव्ही इंडस्ट्रीतील सगळ्यात लोकप्रिय कपल आहे. काही रिएलिटी शोमध्येही अंकिता आणि विकी एकत्र दिसले. सध्या ते 'लाफ्टरशेफ २'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंकिता गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात अंकितानेच लाफ्टरशेफच्या सेटवर "मी प्रेग्नंट आहे" असं म्हटलं होतं. आता त्याबाबत अभिनेत्रीने खुलासा करत प्रेग्नंसीच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. 

अंकिता आणि विकीने त्यांच्या व्लॉगमध्ये प्रेग्नंसीच्या चर्चांवर भाष्य केलं. अंकिता म्हणाली, "गेल्या काही दिवसांपासून या गोष्टी सुरू आहेत. आई कधी होणार, हा प्रश्न असला पाहिजे. संपूर्ण कुटुंब आमच्या मागे लागलं आहे. आमच्यात यावर चर्चाही होत आहेत. पण आता मी या प्रश्नाने थकले आहे. मला माफ करा. पण, जेव्हा मी गरोदर असेन तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेन". 

दरम्यान, अंकिता आणि विकीने २०२१ मध्ये लग्न करत संसार थाटला होता. त्याआधी ते एकमेकांना डेट करत होते. अंकिता आणि विकी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 'लाफ्टर शेफ' आधी विकी आणि अंकिता 'स्मार्ट जोडी' आणि 'बिग बॉस' या रिएलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते. अंकिताला 'पवित्रा रिश्ता'मधून प्रसिद्धी मिळाली. तिने 'मनिकर्णिका', 'बाघी', 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेटिव्ही कलाकार