Join us
Daily Top 2Weekly Top 5

'नगिन 4'चे क्लायमॅक्स शूट करताना प्रेग्नेंट होती अनिता हसनंदानी, फोटो शेअर करुन सांगितले सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 15:43 IST

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. ती या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट बघतेय. काही दिवसांपूर्वीच अनिता आपल्या प्रग्नेंसीची ऑफिशियल सांगितले. पण तुम्हाला माहित आहे काय की अनिता 'नागीन 4' च्या शूटिंग दरम्यान प्रेग्नेंट होती?

 अनिता हसनंदानी नुकताच 'नागिन 4' शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोत अनिताने इच्छाधारी नागिन विशाखाच्या ड्रेसमध्ये दिसतेय. फोटो पोस्ट करतानाच अनिताने लिहिले, 'सुरुवातीच्या काळात ... जेव्हा कोणालाही  माहिती नव्हते मी प्रेग्नेंट आहे. वेळा किती लवकर निघून जातो. मिक्स इमोशन आणि मूड स्विंग्स आहेत.'

  अनिताने 'नागीन 4' मध्ये अनेक अ‍ॅक्शन सीक्वेन्ससुद्धा केले होते. प्रेग्नेंसीमध्ये अशी दृश्ये करणे फार कठीण आहे. 'नागिन 4' मध्ये अनिता हसनंदानी याशिवाय निया शर्मा, रश्मी देसाई आणि विजयेंद्र कुमेरिया मुख्य भूमिकेत होते.

अनिता क्यूट बेबी बम्प फ्लॉन्ट  करताना दिसत असते.अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली होती.