Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिता हसनंदानीनं बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा व्हिडीओ केला शूट, फेब्रुवारीत देणार बाळाला जन्म

By गीतांजली | Updated: January 12, 2021 15:22 IST

टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे.

टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. अनिता हसनंदानी सध्या आपल्या बेबीचे किक एन्जॉय करते आहे. फेब्रुवारी 2021मध्ये अनिता आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या ती आपली प्रेग्नेंन्सी एन्जॉय करते आहे.

अलीकडेच तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करताना व्हिडीओ शूट केलं आहे. या व्हिडीओमध्ये अनिताच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंन्सीचा ग्लो स्पष्ट दिसतो आहे. हा व्हिडीओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यात तिने सफेद रंगाचा हाफ स्कर्ट आणि सफेद रंगाचा ऑफ-शोल्डर क्रॉप टॉप घातला आहे. या आऊटफिटमध्ये तिचं बेबी बम्प स्पष्ट दिसते आहे. व्हिडीओ तिच्यासोबत पती रोहित रेड्डीसुद्धा दिसतो आहे. 

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. 'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली होती.

विशेष म्हणजे लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे. बाळाच्या येण्याची चाहुल लागल्यापासून दोघेही आतुरतेने बाळाच्या आगमनाची वाट पाहात आहेत. अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डीचा प्रेमविवाह होता.अनिता आणि रोहित रेड्डी दोघांची पहिली भेट जीममध्ये झाली होती.

टॅग्स :अनिता हसनंदानी