मनमोहन तिवारींच्या भूमिकेत असणारा रोहीताश गौड म्हणाला “एखाद्या खास,हटके अशा प्रसंगाची आम्ही वाटच बघत होतो.आणि गोवा प्रवासाची संधी नेमक्या वेळी चालून आली.सेटपासून लांब अशा ठिकाणी जाऊन आऊट डोअर शूट करताना आम्हाला एक वेगळे वातावरण,खूप रिफ्रेश झालो.अशा कामांमुळे दैनंदिन चौकटीतून बाहेर पडता येते.गोव्यात आम्ही खूप मजा केली.चर्च वेडिंग म्हणजे महिलांसाठी नटण्याथटण्याची पर्वणीच.त्यांनी त्यांच्या वेशभूषेवर आणि रंगभूशेवर विशेष मेहनत घेतली आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेलच.विभूतीनारायण मिश्रा या भूमिकेत दिसणारे असिफ शेख म्हणाला,'भाभीजी’चाआगामी एपिसोड आम्हा सगळ्यांसाठी बऱ्याच कारणांसाठी खास आहे.एक अत्यंत सुंदर चर्च या एपिसोडसाठी निवडले होते आणि त्यामुळे आम्हा सर्वांचा मूडही मस्त बनला होता.”असिफ पुढे हसत हसत म्हणाले“या एपिसोडसाठी मी जेम्स बाँडसारखा दिसणार आहे असे मी आधीच जाहीर केले होते आणि आमच्या वेशभूषा,रंगभूषा टीमने मला मुळीच निराश केले नाही.आम्हाला जेवढी मजा आली तेवढीच रसिकांनाही येणार आहे.
अनिताभाभींच्या भूमिकेत असलेली सौम्य टंडन म्हणाली “एक ख्रिश्चन वधू म्हणून चर्चमध्ये मिरवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.पांढरा गाऊन बरेचदा घातला होता पण अशाप्रकारे वेडिंग गाऊन घालण्याचा अनुभव खासच होता.मला व्यवस्थित बसणारा आणि शोभणारा पांढराशुभ्र गाऊन शोधण्यासाठी मी खूप धावपळ केली.एक तर मला पांढरे गाऊन फारसे आवडत नाहीत आणि कमरेखाली फुगेदार असलेला गाऊन शरीरयष्टीनुसार फिट होणे कठीण असते.त्यामुळे माझी फिगर नीट उठून दिसेल असाच गाऊन मी निवडला.मी निवडलेला बिनबाह्यांचा, भरपूर पायघोळ असलेला आणि सुंदर झिरझिरीत असलेला गाऊन मला कूप सुट होत होता.तसेच फ्रेंच बनमध्ये बसवलेले केस, हलकासा मेकप आणि थोडी लिपस्टिक इतकीच वेशभूषा मी केली होती. एक सुंदर लूक येण्यासाठी मी साधे फुलपाखराच्या आकाराचे डायमंड पेंडंट आणि इयरिंग्ज घातले होते.या सगळ्या पेहेरावात त्या सुंदर चर्चमध्ये एक ख्रिश्चन वधू म्हणून वावरण्यात एक वेगळीच मजा आली.हा लूक माझ्या सगळ्यात आवडत्या लुक्सपैकी एक ठरला.तर मंडळी अशा तऱ्हेने आपली ही दोन्ही जोडपी नटूनथटून चर्चवेडिंगसाठी तयार तर झालीत.पण‘आय डू’ म्हणण्याची संधी त्यांना मिळणार आहे का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.