Join us

ऐश्वर्या नारकरांच्या लेकाचा आज वाढदिवस; गर्लफ्रेंड पोस्ट शेअर करत म्हणाली, "माय लव्ह..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:11 IST

कोण आहे अमेयची गर्लफ्रेंड? नारकरांची होणार सून...

अभिनेते अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठीतील सर्वांचं आवडतं कपल. दोघांचे सोशल मीडियावरील रिल्स तर सतत व्हायरल होत असतात. काही वेळेला दोघं ट्रोलही झाले आहेत. मात्र ते जगण्याचा आणि नवीन ट्रेंड्सचा मनमुराद आनंद घेत असतात. त्यांना एक मुलगा आहे. अमेय नारकर (Amey Narkar)असं त्याचं नाव आहे. अमेय परदेशात असतो. आज अमेय वाढदिवस साजरा करतोय. अमेयची गर्लफ्रेंड मराठी मालिकेतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अमेयसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत दिसत असलेली अभिनेत्री ईशा संजय (Isha Sanjay). अमेय नारकर ईशाला अनेक वर्षांपासून डेट करत आहे. ईशा अनेकदा अमेयसोबतचे फोटो पोस्ट करत असते. तसंच तिने होणारी सासू ऐश्वर्या नारकर यांच्यासोबतही पोस्ट शेअर केल्या आहेत. ऐश्वर्या नारकर तिच्या प्रत्येक पोस्टला लाईकही करतात. आता ईशाने अमेयसोबतचे क्युट फोटो पोस्ट करत लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह...तुझी रोज आठवण येते. पुन्हा भेटू तोवर मी दिवस मोजते आहे". 

अमेय हा सध्या परदेशात आहे. तो उच्चशिक्षण घेत आहे. तर ईशा ही भारतातच असून 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत काम करतेय.  सूर्यादादाच्या चार बहि‍णींपैकी 'राजश्री' भुमिका ही ईशा साकारतेय. तिला मालिकेत प्रेमाने सगळे राजू म्हणत असतात. तर गर्लफ्रेंड ईशा आणि आपल्या आई-वडिलांप्रमाणेच अमेयलाही कलाक्षेत्रातच करिअर करायचं आहे.  त्याने मध्यंतरी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं. 'खरा इन्स्पेक्टर मागावर' या व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा अमेयनं सांभाळली होती. तो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंडस्ट्रीत पूर्णपणे सक्रीय होणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारऐश्वर्या नारकरमराठी अभिनेतारिलेशनशिप