Join us

अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:25 IST

मराठी टेलिव्हिजनचा हँडसम हिरो बनला नवरदेव! अक्षय आणि साधनाचा स्वप्नवत लग्नसोहळा पार पडला

Akshay Kelkar Wedding: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar)  लग्नबंधनात अडकला आहे. आज ९ रोजी अभिनेत्यानं त्याची गर्लफ्रेंड 'रमा' म्हणजेच साधना काकटकरसोबत लग्नगाठ बांधत एक नवीन सुरुवात केली आहे.  मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार अक्षयच्या लग्नाला पोहोचले. अक्षयच्या लग्नातील सुंदर क्षण अभिनेत्री अमृता धोंगडे हिने तिच्या इन्साग्राम स्टोरीवर शेअर केलाय. 

अमृता धोंगडेने शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षय आणि त्याची पत्नी पारंपरिक लूकमध्ये दिसून येत आहे. लाल रंगाच्या साडीत साधना अतिशय सुंदर दिसतेय. तर काळ्या रंगाच्या सूटमध्ये अक्षयदेखील देखणा दिसतोय. अक्षय आणि साधनाच्या मुख्य लग्नविधींचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. लग्नातील फोटो आता अक्षय कधी सोशल मीडियावर शेअर करतो, याकडे चाहत्याचं लक्ष लागलं आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या लग्नाची धामधूम सुरू होती. काही दिवसांपुर्वीच अभिनेत्याच्या घरी ग्रहमख विधी सुद्धा संपन्न झाला. त्यानंतर मेहंदी सोहळा आणि काल  हळदी समारंभ दणक्यात पार पडला होता.  या कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

१० वर्षांचं रिलेशनशिप ते लग्नमंडप!

अक्षय आणि साधना हे दोघेही जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. बिग बॉसच्या घरात असताना अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख 'रमा' असा केला होता.  गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अक्षय केळकरने गर्लफ्रेंड साधनाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला होता. अक्षयनं  होणाऱ्या बायकोची ओळख चाहत्यांना करून दिली होती. साधना काकटकर ही एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. मेतरा, आनंदाचे गाव, नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनाने तिचा आवाज दिला आहे.  अक्षय केळकर हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कलर्स मराठीवरच्या 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा तो महाविजेता होता.

टॅग्स :मराठी अभिनेताबिग बॉस मराठीलग्न