Join us

Ajay-Atul : रिअ‍ॅलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? अजय-अतुल यांनी सांगितलं ‘सीक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 17:34 IST

Ajay Atul : ‘कोण होणार करोडपती’ या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अजय -अतुल यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये...

सोनी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रमात या शनिवारी एक खास जोडी सहभागी होणार आहे. होय, अवघ्या देशाला आपल्या गाण्यांवर थिरकायला भाग पाडणारे संगीतकार अजय-अतुल या शोमध्ये सहभागी होणार आहेत. अजय अतुलच्या गाण्यांनी  प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं  आहे.  मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदीतही या जोडीचा दबदबा आहे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर अजय-अतुल येणार म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  या शो चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अतुल गोगावले यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये. रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक नवे गायक येतात. यापैकी एक विजेता ठरतो. पण पुढे या विजेत्या गायकांचा काय होतं? यावर अतुल बोलले.

मोठमोठ्या सिंगींग रिअ‍ॅलिट शोमध्ये जिंकलेल्या गायकांचं  पुढे काय होतं?  हा प्रश्न तसाही प्रेक्षकांना नेहमीच पडतो. रिअ‍ॅलिटी शो दरम्यान या गायकांचं प्रचंड कौतुक होतं. पण संपल्यानंतर बोटावर मोजण्याइतके काही अपवाद सोडले तर बहुतांश  गायक कुठेही दिसत नाहीत. त्यांचं पुढे नक्की काय होतं? ते प्लेबॅक सिंगर म्हणून यशस्वी का होत नाहीत? यावर अजय-अतुल स्पष्टचं बोलले.

 काय म्हणाले अतुल?येत्या भागाच्या प्रोमोमध्ये अतुल गोगावले यांनी गाण्यांच्या रिअ‍ॅलिटी शोचं सत्य सांगितलं आहे. ते म्हणाल ‘सिंगींग रिअ‍ॅलिटी शो मधून जे गायक जिंकले आहेत त्यांना आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये प्लेबॅक सिंगिंगसाठी बोलावतो तेव्हा त्याला ते गाणं  योग्य प्रकारे गाता येत नाही. जेव्हा या गायकांना स्वत: गाणं गाण्याची वेळ येते तेव्हा त्याला माहीतच नसतं की त्या गाण्यावर कशा पद्धतीने आरूढ व्हायचं.’अजय अतुल या जोडीने आजपर्यंत अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. नुकतेच या दोघांनी ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वाचं परीक्षण केलं होतं.  

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी