Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळाष्टमीनिमित्त 'नटरंग'मधील लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकरांनी केला सुंदर डान्स, चाहते म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 15:06 IST

गोकुळाष्टमीनिमित्त ऐश्वर्या नारकर यांनी नटरंग सिनेमातील गाजलेल्या गाण्यावर केलेला भन्नाट डान्स चर्चेत आहे (aishwarya narkar)

आज गोकुळाष्टमी. आज अनेकजण श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत. लोक मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विविध माध्यमांतून श्रीकृष्ण भक्ती प्रकट करत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी गोकुळाष्टमीनिमित्त 'नटरंग'मधील गाजलेल्या गाण्यावर सुंदर डान्स करत प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मन जिंकलंय.

ऐश्वर्या नारकर यांनी केली श्रीकृष्णभक्ती

ऐश्वर्या नारकर यांनी एक डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ऐश्वर्या पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या दिसतात. या साडीवर लाल रंगाची बॉर्डर दिसते. 'नटरंग'मधील लोकप्रिय गाण्यावर ऐश्वर्या नारकर सुंदर नाचताना दिसतात. ऐश्वर्या नारकर यांनी 'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी' या गाण्यावर डान्स केलाय. ऐश्वर्या यांनी साध्या सोप्या तरीही सुंदर स्टेप करुन या गाण्यावर डान्स केलाय. ऐश्वर्या यांच्या चाहत्यांनी या डान्सला पसंती दिली असून कमेंट केल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर यांचं वर्कफ्रंट

ऐश्वर्या यांची सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत नव्याने एन्ट्री झाली आहे. या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोचकाच्या भूमिकेत होत्या. या मालिकेत विरोचकाचा अंत झाल्यानंतर आता याच मालिकेत ऐश्वर्या नव्या भूमिकेत दिसणार आहेत. विरोचकानंतर आता या मालिकेत त्या मैथिली (शतग्रीव) हे खलनायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहेत. मालिकेतील या नव्या ट्विस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.  

टॅग्स :ऐश्वर्या नारकरकलर्स मराठी