Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजश्री पाठोपाठ तिच्या सावत्र आईचंही झी मराठीवर कमबॅक, मालिकेत दमदार एन्ट्री, फर्स्ट लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:50 IST

तेजश्री पाठोपाठ तिची ऑनस्क्रीन आई अभिनेत्री आशा शेलार यांचंदेखील झी मराठीवर पुनरागमन होत आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेत आशा शेलार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली तेजश्री प्रधान पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करत आहे. तेजश्री आणि सुबोध भावे यांची नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेजश्री पाठोपाठ तिची ऑनस्क्रीन आई अभिनेत्री आशा शेलार यांचंदेखील झी मराठीवर पुनरागमन होत आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेत आशा शेलार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

आशा शेलार या तेजश्री प्रधानच्या मालिकेत दिसणार नाहीत. पण, एका नव्या मालिकेत त्यांची वर्णी लागली आहे. झी मराठीवरील कमळी या मालिकेतून आशा शेलार प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत त्या कामिनीदेवीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. कमळी मालिकेतील त्यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कमळी ही मालिका येत्या ३० जूनपासून सुरू होणार आहे. या मालिकेत आशा शेलार पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

दरम्यान, आशा शेलार यांनी 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेत जान्हवीच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिकाही चाहत्यांना आवडली होती. याशिवाय, 'छत्रीवाली', 'खुलता कळी खुलेना', 'हे मन बावरे', 'पिंकीचा विजय असो' या मालिकांमध्येही त्या दिसल्या होत्या. 

टॅग्स :तेजश्री प्रधान टिव्ही कलाकार