Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋतुराज फडकेनंतर आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, पुण्यात थाटात पार पडला विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:43 IST

पुण्यात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटीनी हजेरी लावली होती.

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकानंतर एक सेलिब्रिटीलग्नबेडीत अडकत आहेत. अक्षया देवधर व हार्दिक जोशीने लग्नगाठ बांधली. त्याच दिवशी अभिनेता आशय कुलकर्णीहीचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर  बाळूमामाच्या नावाने चांगभलं फेम अभिनेता सुमीत पुसावळे विवाह पार पडला. अलिकडेच 'मन उडू उडू झालं' फेम ऋतुराज फडके याने देखील लग्नगाठ बांधली. यानंतर आता आणखी एक मराठमोळ्या अभिनेता बोहल्यावर  चढला आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल झालेत.   

 नुकताच अभिनेता आदित्य सातपुतेचा नेहा कदम सोबत पुण्यात थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. आदित्यचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आदित्य आणि नेहाच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रेटीनी हजेरी लावली.  संगीतकार देवदत्त बाजी, अभिनेत्री राधा सागर आणि सर्व कंटेंट क्रिएटर इंडस्ट्री तसेच अनेक दिग्गज कलाकार आणि राजकीय नेते आदित्य आणि नेहाच्या लग्नसोहळ्यात  उपस्थित होते.

आदित्यने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करून जवळपास २५ हून अधिक मराठी म्युझिक अल्बम केले. जसे कि हुरपरी, ट्रिंग ट्रिंग, फक्त बायको पाहिजे, लयं गुणाची हाय, रूप साजरं. त्यातले सर्वच म्युझिक अल्बम सुपरहिट झाले आहेत. 

टॅग्स :सेलिब्रिटीलग्न