बॉलिवूड लाईफशी बोलताना कृतिका म्हणाली, जॅकी हा माझा फक्त को-स्टार आहे. आम्ही नुकतेच आमच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कृतिका याआधी एकता कपूरच्या बदतमीज दिल चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होती. ज्यात तिच्यासह करिना कपूर हि दिसणार होती. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाचे काम पुढे सरकू शकले नाही.
कृतिका कामरा टेलिव्हिजनवरील मालिका ‘कितनी मोहब्बत है’ यातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. या मालिकेतील कृतिकाने साकारलेली आरोही आणि ‘कुछ तो लोग कहेंगे’मधील डॉ. निधी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. कृतिका सध्या प्रेम या पहेली- चंद्रकांता' या मालिकेत दिसते आहे. कृतिका आणि करण कुंद्रा बºयाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.कृतिका कामरा आणि करण कुंद्रा २००९ मध्ये ‘कितनी मोहब्बत है’मध्ये एकत्र बघावयास मिळाले होते. यानंतर हे दोघेही एका ‘नच बलिए’ या रिअॅलिटी शोमध्ये बघावयास मिळाले. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.