'ससुराल सिमर का' या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिकाचे पहिले लग्न झालेले होते.मात्र काही कारणास्तव तिचे लग्न तुटले.त्यानंतर तिच्या कठीण काळात शोएबने तिला आधार दिला आणि तिची मदत केली.दुसरीकडे शोएबच्या पडत्या काळात दीपिकाने त्याला साथ दिली. त्याच्या पाठिशी ठामपणे ती उभी राहिली.त्याच काळात ते एकमेकांच्या कधी प्रेमात पडले हेच त्यांना कळले नाही.प्रेमात असल्याचे जाणवताच त्यांनी लग्न करण्याच निर्णय घेतला होता.मात्र त्यांना त्यांच्या या प्रेमाची जाणीव झाली तो क्षण होता.शोएबने ससुराल सिमर का ही मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेकांची कमतरता जाणवू लागली.या काळात दिपिका फार खचून गेली होती.त्यानंतर मात्र दोघे जवळ आले आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.गेल्या तीन-साडे तीन वर्षांपासून ते एकमेंकांना डेट केल्यानंतर आता लग्नबंधनात अडकणार आहे.
दीपिकाने 2013 मध्ये लव्ह मॅरेज केले होते.परंतू 2015 मध्ये तिचा काही कारणामुळे घटस्फोट झाला.दीपिकाने शोएबमुळे तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला असल्याचेही बोलले जाते.दीपिकाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटेल होते की,"लव्ह मॅरेज यशस्वी होतातच हे गरजेचे नाही. यामध्येही ब-याचदा अनेक समस्या येत असतात.कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही बाजुंनी बाँडींग असणेही तितकेच गरजेचे आहे. कदाचित पती पत्नीमध्ये असणारे बाँडींग निर्माण झाले नसल्यामुळे मी घटस्फोट घेतला असल्याचे सांगितले.यांत तिच्या फॅमिलीनेही तिला पूर्ण सपोर्ट केला आहे. शोएबनेही तिच्या कठिण काळात मदत केली असल्याचेही तिने सांगितले.