लोकप्रिय यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. २०२४ मध्ये त्याने रिद्धी जाधवशी विवाह केला होता. लग्नासाठी रिद्धीने इस्लाम धर्म स्वीकारल्याचीही चर्चा होती. एवढेच नाही तर रिद्धीने आपले नाव बदलून आयशा केलं आणि आता ती बुरखा परिधान करते. यावरुन सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना अदनानने अत्यंत कडक शब्दांत आपली बाजू मांडली आहे.
'लेट्स टॉक विथ नमिता'शी बोलताना अदनान शेख याला पत्नीला बुरखा घालण्यासाठी सक्ती करण्यात आली का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, "मी माझे आयुष्य माझ्या अटींवर जगतो. जे लोक आपल्या पत्नींना 'पर्दा'मध्ये ठेवत नाहीत, त्यांना 'जन्नत' (स्वर्ग) प्राप्त होणार नाही, असे मी मानतो. मी एक पुरुष आहे आणि इतर पुरुष स्त्रियांकडे कोणत्या नजरेने पाहतात, हे मला चांगले ठाऊक आहे".
अदनानने यावेळी आधुनिक जीवनशैलीवरही भाष्य केलं. तो म्हणाला, "आजच्या काळात लोक आपल्या पत्नींना आणि मातांना प्रदर्शनाची वस्तू समजतात. अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास प्रवृत्त करतात. प्रत्येकाचे आयुष्य स्वतंत्र असते आणि मृत्यूनंतर आपल्याला आपल्या कर्माचा हिशोब द्यावा लागणार आहे. मी माझे व्यवहार धर्माच्या चौकटीत राहून अत्यंत जबाबदारीने पार पाडत आहे".
दरम्यान, अदनाननं लग्नावेळीही पत्नीचा चेहरा झाकून ठेवला होता. त्या घटनेमुळेही सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
Web Summary : YouTuber Adnan Sheikh defends his wife Ayesha's choice to wear a burqa, stating it's a path to paradise. He criticized modern lifestyles, asserting he lives by religious principles and rejects objectification of women.
Web Summary : यूट्यूबर अदनान शेख ने पत्नी आयशा के बुर्का पहनने का बचाव किया, कहा कि यह स्वर्ग का मार्ग है। उन्होंने आधुनिक जीवनशैली की आलोचना करते हुए कहा कि वह धार्मिक सिद्धांतों का पालन करते हैं और महिलाओं को वस्तु बनाने का विरोध करते हैं।