Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 14:18 IST

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत हा विवाह सोहळा पार पडला. सध्या या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

लॉकडाउनमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुवेधा देसाई नुकतीच लग्नबेडीत अडकली आहे. 1 जून रोजी तिचा सागर गांवकरसोबत विवाह सोहळा पार पडला. लॉकडाउनमुळे सर्व काही बंद आहे. तसेच विवाह सोहळ्यांना देखील बंदी असल्यामुळे तिने परवानगी घेऊन हे लग्न केले आहे. सुवेधाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

वैजू नंबर वन या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुवेधा देसाई व सागर गांवकर यांनी चेहऱ्याला मास्क लावून लग्नाचे विधी पार पाडले. फार कमी लोकांच्या उपस्थितीत तिचा हा विवाहसोहळा पार पडला. दोन्ही कुटुंबानेदेखील सोशल डिस्टंसचे नियम पाळत हे कार्य पार पाडले.

उपस्थित असलेल्या लोकांनी चेहऱ्याला मास्क लावले होते. तसेच ठिकठिकाणी सॅनिटायझर होते. 

अभिनेत्री सुवेधा देसाई दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत किंजलच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली होती. सध्या ती वैजू नंबर वन मालिकेत साउथ इंडियन मुलीची भूमिका साकारते आहे.

तर सागर गांवकर हा चित्रपट दिग्दर्शक व लेखक आहे. काही वर्षांपूर्वी त्याने सुवासिनी मालिकेचे दिग्दर्शन केले होते.

टॅग्स :टेलिव्हिजन