Join us
Daily Top 2Weekly Top 5

रील लाईफ नवरा-बायको अडकले रिअल लाईफच्या बंधनात, एका लग्नाची अनोखी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:20 IST

त्यांच्या सारखपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

झी मराठीवरील पडद्यावरील ‘लग्नाची वाइफ वेड्डिंगची बायकू’ या मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. फार कमी वेळातच या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थाव निर्माण केलं होत. या मालिकेन प्रेक्षकांचा निरोप घेऊन बराच काळ उलटला असला तरी यातील प्रत्येक पात्र अजूनही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.  या मालिकेतील मदन , काजोल आणि मारिया हे तीन पात्र चांगलीच गाजली होती.

मदन म्हणजेच अभिनेता विजय आंदळकर आणि काजोल म्हणजेच अभिनेत्री रूपाली झंकार या ऑनस्क्रिन कपलनं आता खऱ्या आयुष्यात ही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाये. नुकताच विजय  आणि रूपाली यांचा साखरपुडा पार पडला आहे.

 रूपालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही खूशखबर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोघांचा सारखपुडा अगदी साध्या पद्धतीनं पार पडला.हली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये...सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये...असे कॅप्शन रुपालीने साखरपुड्यातील एका फोटोला दिले आहे.  रुपालीने शेअर केलेल्या फोटोवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.  काही दिवसांपूर्वीच रुपालीचा मेहंदी कार्यक्रम देखील पार पडला.. विजय हा अभिनयासोबत एक वकील म्हणून देखील काम करतो.लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार आहे.

टॅग्स :झी मराठी