Join us  

लग्नाच्या ८ वर्षांनंतर आई बनण्यावरून ट्रोल झाली ही अभिनेत्री, युजर्सना सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 5:10 PM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील जास्त कपल पॅरेंट्स बनणार आहेत.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील जास्त कपल पॅरेंट्स बनणार आहेत. या कलाकारांच्या यादीत जय भानुशाली व माही विज यांच्याही नावाचा समावेश आहे. माही विज व जय भानुशाली यांचं २०११ साली लग्न झालं होतं. लग्नाच्या ८ वर्षांनंतर माही आई बनणार आहे. पण, तब्बल आठ वर्षानंतर आई बनणार म्हणून सोशल मीडियावर तिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व प्रश्नांवर माहीने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं आहे. 

माही विजने लिहिलं की, मी माझ्या प्रेग्नेंसीला घेऊन विविध अफवा ऐकल्या. मी सर्वांना सांगू इच्छिते की मला इनफर्टिलिटी सारखी कोणतीही समस्या नाही. हा माझा निर्णय होता की मी माझ्या बाळासाठी योग्य वेळेची वाट पाहू आणि माझ्या जबाबदाऱ्या चांगल्यारित्या पार पाडू.

माहीने पुढे लिहिले की, आधीपासून माझ्यावर माझ्या आई वडिलांची जबाबदारी आहे. त्यात बाळाची जबाबदारी या सर्व गोष्टींपेक्षा मोठी बाब आहे. त्यामुळे आई बनण्याचा निर्णय उशीरा घेतला. 

खरेतर माही इतक्या उशीरा प्रेग्नेंट राहिली त्यावर काही लोकांनी तिला प्रेग्नेंसीची काहीतरी समस्या होती असे म्हटलं. त्यावर माहीने या पोस्टच्या माध्यमातून आपले मत मांडलं.

माहीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिचे खूप कौतूक झाले. एका युजरने लिहिले की, खूप छान. तर एका युजरने लिहिलं की, तुम्ही खुप चांगली मुलगी आहात. तुम्ही सदैव खुश रहाल, अशी प्रार्थना करतो. जय व माही शेवटचे एकत्र किचन चॅम्पियन सीझन ५मध्ये दिसले होते.