Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळाच्या या अभिनेत्रीने केले मुंडण, कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:14 IST

शेअर केले बाल्ड लुकचे अनेक व्हिडीओ

ठळक मुद्देजया यांनी झांसी की रानी, थपकी प्यार की, क्योंकि सास भी कभी बहू थी, बनू मैं तेरी दुल्हन, हातिम, कसम से, गंगा, कैसा ये प्यार है अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

अ‍ॅक्टिंगच्या दुनियेत लुक्सचे अतोनात महत्त्व आहे. याचमुळे स्टार्स आपल्या लुक्सवर प्रचंड मेहनत घेतात. स्वत:ला अधिकाधिक सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात राहतात. पण इंडस्ट्रीतले काही स्टार्सला मात्र लुक्समुळे काहीही फरक पडत नाही. ते सुंदर चेह-यापेक्षा अ‍ॅक्टिंग अधिक महत्त्वाची मानतात. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री जया भट्टाचार्य. आता जया यांनी लुक्सची पर्वा न करता मुंडण केले आहे. आपल्या या बाल्ड लुकचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

व्हिडीओ शेअर करताना जया यांनी लिहिले, ‘सरप्राइज, अनेक दिवसांपासून हे करायचे होते. पण यासाठी कधीच इतके मोटिवेशन मिळाले नाही. घरचे याच्या विरोधात होते. ते मला नेहमीच लांब केस ठेवायला सांगत. कारण मी ज्या इंडस्ट्रीत आहे तिथे लुक्स महत्त्वाचे आहे. पण माझ्यासाठी अ‍ॅक्टिंग महत्त्वाची आहे. त्यामुळे मी मुंडण करण्याचा निर्णय घेतला. माझे केस मी सांभाळून ठेवले आहेत. हे केस मी कॅन्सर रूग्णांसाठी विग बनवण्यासाठी देणार. ’

जया यांनी झांसी की रानी, थपकी प्यार की, क्योंकि सास भी कभी बहू थी, बनू मैं तेरी दुल्हन, हातिम, कसम से, गंगा, कैसा ये प्यार है, जय हनुमान, करम अपना अपना, अंबर धारा अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :टेलिव्हिजन