Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्रीला चेह-यावर स्कार्फ बांधून करावा लागतोय पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास, काय आहे त्यामागचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 08:00 IST

प्रवास करताना मात्र  तिला तिची ओळख लपवूनच बाहेर पडावं लागतं. तेव्हा आजूबाजूला लक्ष ठेवा की तुमचे  आवडते कलाकार कदाचित तुमच्या बाजूला बसलेले असतील . 

छोट्या पडद्यावरील 'फुलपाखरू' हि मालिका जवळपास एक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर आणि कलाकारांवर प्रेमाचा वर्षाव केला. वैदेही आणि मानस यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहे. आता वैदेहीला बाळ होणार आहे. होणाऱ्या बाळाचं नाव काय असेल , मुलगा असेल कि मुलगी असेल याच्या चर्चा सोशल मीडिया वर सुरु झाल्या आहेत . अभिनेत्री हृता दुर्गुळे वैदेही ची भूमिका करत आहे . हृता दुर्गुळे ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिची लोकप्रियता एवढी असते, की ते कुठेही गेल्यावर त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो.

 

मग ती शॉपिंगला किंवा फिरायला जातच नाही का? तर तसं नाही.  तिला फुलपाखरूच्या शूटिंगला जायला सुद्धा प्रवास करावाच लागतो . सामान्यतः ती तिच्या गाडीने प्रवास करते . पण कधीकधी  मुंबईच्या भयानक  ट्रॅफिकमध्ये  अडकून या कलाकारांचा सुद्धा  खूप वेळ वाया जातो. त्यामुळे सर्वांची आवडती वैदेही म्हणजेच हृता सुद्धा वेळेत पोहोचण्यासाठी कधी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करते.  अशावेळी प्रवास करताना मात्र  तिला तिची ओळख लपवूनच बाहेर पडावं लागतं. तेव्हा आजूबाजूला लक्ष ठेवा की तुमचे  आवडते कलाकार कदाचित तुमच्या बाजूला बसलेले असतील . 

याबद्दल बोलताना हृता म्हणते , "खरंतर मला बस , रिक्षा, टॅक्सी , मेट्रो आणि रेल्वे ट्रेन ह्या सगळ्या सार्वजनिक वाहतुकीची माध्यमे आवडतात.लहानपणापासूनच मी सगळीकडे बस रिक्षा , रेल्वे ने प्रवास केला आहे .  मला शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी मी कधी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करते पण सहसा मी तोंडावर स्कार्फ बांधूनच बाहेर जाते. पण, लोकं मला माझ्या डोळ्यांवरून आणि हातावरच्या टॅटूवरूनही ओळखतात. एकदा मी रात्री ९:३०  वाजता  मेट्रो ने प्रवास करत असताना माझ्या बाजूची मुलगी झी ५ वर फुलपाखरू पाहत होती. मला खूप मजा आली पण थोड्याच वेळात तिने मला ओळखल. मग त्या मुलीबरोबर तिथे मी फोटो काढला. कारण चाहत्यांना नाराज करायला मला आवडत नाही. तिने मला माझ्या हातावरच्या टॅटू आणि डोळ्यांवरून ओळखल्याचं सांगितलं.आणि फुलपाखरूची  फॅन आहे आणि सगळे एपिसोड ती पाहते . रात्री  ८:३० चा लाईव्ह शो पाहायला नाही मिळाला कि झी ५ वर ती शो पाहते असेही सांगितले. त्यामुळे फॅन्सबरोबर ट्रॅव्हल करण्याची ही मजा सुद्धा वेगळी आहे . "