Join us

"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव

By देवेंद्र जाधव | Updated: July 22, 2025 10:40 IST

विजय पटवर्धन यांची पत्नी वृषाली सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. कॅन्सर झाल्यावर त्यांनी काय केलं, याचा अनुभव प्रत्येक महिलेने जरुर वाचण्यासारखा आहे

झी मराठीवरील 'पारु' मालिकेत झळकणारे अभिनेते म्हणजे विजय पटवर्धन. गेली अनेक वर्ष विजय मराठी मनोरंजन विश्वातील विविध सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये काम करत आहेत. विजय यांच्या कुटुंबाला अलीकडेच मोठ्या आघाताला सामोरं जावं लागलं. विजय यांची पत्नी वृषाली पटवर्धन यांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे विजय आणि त्यांचं कुटुंब दुःखात होतं. परंतु वृषाली यांनी कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला धीराने तोंड दिलं. वृषाली सुद्धा अभिनेत्री आहेत हे फार कमी जणांना माहित असेल. जाणून घ्या काय घडलं.

विजय यांच्या पत्नीला कॅन्सरचं निदान झालं, आणि...

रसिकमोहिनी या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विजय यांच्या पत्नीने घटनाक्रम सांगितला. वृषाली यांचा जेव्हा पेट स्कॅनचा (PET) रिपोर्ट आला तेव्हा त्यात फक्त तीनच गाठी दिसल्या, पण जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा तब्बल २९ गाठी होत्या. वृषाली यांच्या दादाच्या हातात बरणी भरुन गाठी आणून दिल्या आणि लॅबमध्ये द्यायला सांगितल्या. आयुष्य सुरळीत सुरु असताना कॅन्सरच्या आजाराने वृषाली यांना ग्रासलं. वृषाली यांनी जेव्हा टेस्ट केली तेव्हा दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर ओलांडला असल्याचं त्यांना समजलं. या आजाराला त्यांनी इतकं गांभीर्याने घेतलं नाही किंवा त्या घाबरुनही गेल्या नाहीत. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी त्यांनीच सर्वांना धीर दिला. "विजय आज माझं ऑपरेशन आहे, तुझं नाही", असं म्हणत त्यांनी विजय पटवर्धन यांनाही शूटिंगला पाठवलं. भूल देण्यासाठी 5 ml औषध दिलं होतं. परंतु वृषाली यांची अनेक ऑपरेशन्स झाल्याने त्यांना 10 ml औषध हवं असतं, हे कळताच डॉक्टर हसायला लागले.

कॅन्सरच्या आजारपणात नर्मदा परीक्रमा केली पूर्ण

कॅन्सरवरील उपचार सुरु असताना सुरु असताना वृषाली यांनी मोठा निर्णय घेतला तो म्हणजे नर्मदा परिक्रमा करण्याचा. या सर्व आजारपणात वृषाली कौटुंबिक, शारीरिक, मानसिक अडचणींचा सामना वृषाली करत होत्या. या सर्व गोष्टींमधून स्वतःला वेळ मिळाला म्हणून त्यांना नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नर्मदा परिक्रमेचा तब्बल ३५०० किमी प्रवास पायी नाही तर बसने करता येईल, अशी डॉक्टरांनी परवानगी दिली. त्यामुळे वृषाली यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या सर्व कठीण काळात पती विजय पटवर्धन यांची खंबीर साथ त्यांना मिळाली.वृषाली यांनी 'अवंतिका', 'अरे हाय काय नाय काय', 'मंगळसूत्र', 'लग्नाची बेडी', 'उलाढाल' अशा मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये अभिनय केलाय. वृषाली यांनी काही काळानंतर अभिनय क्षेत्र सोडून कुुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :मराठीमराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार