Join us
Daily Top 2Weekly Top 5

'फौजी' आज्या आता होणार 'दादा', 'लागिरं झालं जी'च्या टीमसोबत नितीशची नवी मालिका, प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:40 IST

लागिरं झालं जी मालिकेतील नितिश चव्हाणच्या नव्या मालिकेचा प्रोमो झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (nitish chavan)

'लागिरं झालं जी' मालिका सर्वांना आठवत असेलच. 'लागिरं झालं जी' मालिकेतील अस्सल गावच्या मातीशी जोडणारी कथा सर्वांच्या मनात घर करुन गेली. या मालिकेत भारतीय सीमेवर लढणारे फौजी आणि त्यांच्या कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा बघायला मिळाली. मालिकेतील शितली आणि आज्याच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. याच आज्याची नवी मालिका झी मराठीवर सुरु होणार आहे.

आज्या म्हणजेच अभिनेता नितिश चव्हाणच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच भेटीला आलाय. 'लाखात एक आमचा दादा' असं या मालिकेचं नाव आहे. मालिकेच्या प्रोमोत बघायला मिळतं की, चहुबाजुंनी भंडाऱ्याची उधळण होत आहे. नितिश खाली लोटांगण घालून खंडोबाला नमस्कार करतो. पुढे तो दोन हात जोडून खंडोबाला नमस्कार करताना दिसतो. 'सदानंदाचा येळकोट येळकोट' म्हणत नितिश खंडोबाचा जागर करतो.

नितिशच्या नव्या मालिकेचा हा प्रोमो अल्पावधीतच व्हायरल झालाय. 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत आणखी कोणते कलाकार झळकणार याविषयी निश्चित माहिती समोर आली नाहीय. या मालिकेच्या निमित्ताने नितिश अनेक वर्षांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करतोय. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्वेता शिंदे करत आहे. श्वेताने 'लागिरं झालं जी' आणि 'देवमाणूस' मालिकांची निर्मिती केलंय.

टॅग्स :नितीश चव्हाणलागिरं झालं जीटेलिव्हिजन