Join us

"सुरेखाताई तुला मानाचा मुजरा..."; कुशल बद्रिकेची 'लावणीसम्राज्ञी'साठी भावुक पोस्ट, म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:45 IST

कुशल बद्रिकेने लावणीसम्राज्ञीसाठी सुरेखा पुणेकर यांच्यासाठी लिहिलेली भावुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे

मराठी अभिनेता कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. कुशल सोशल मीडियावर त्याच्या आयुष्यातील विविध अपडेट शेअर करताना दिसतो. कुशल बद्रिके सध्या 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये काम करतोय. या शोमध्ये सध्या विविध सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. अशातच  'चला हवा येऊ द्या'मध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर सहभागी झाल्या होत्या. सुरेखा यांच्यासाठी कुशलने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. काय लिहितो कुशल? 

कुशलने सुरेखा यांच्यासाठी लिहिलं की, ''आयुष्यभर रंगभूमीवर थिरकलेलं पाऊल.. थकलं.. थकलं, असं वाटत असतानाच, त्या पायांमध्ये वीज चमकावी आणि नटराजाचा साक्षात्कार व्हावा असा काहीसा अनुभव आला मला. आयुष्याच्या वाटेवर बऱ्याचदा उपेक्षाच समोर आली, तरीही वाट न बदलता, न थकता चालत राहून, लावणी आणि तमाशाला सन्मान मिळऊन देणाऱ्या सुरेखाताई तुला मानाचा मुजरा. कुणाच्या चपला किती घासल्या गेल्यात आणि कुणाच्या टाचा किती झिजल्यात हे एखाद्या व्यक्तीच्या चरणाशी नतमस्तक झाल्या शिवाय कळत नाही.''

अशाप्रकारे कुशलने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. कुशल सध्या 'चला हवा येऊ द्या'मध्ये विविध भूमिका साकारताना दिसतोय. कुशल 'चला हवा येऊ द्या'मध्ये विविध कॅरेक्टर साकारताना दिसतो. कुशलचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं आहे. कुशलची बायको सुनैना बद्रिके सुद्धा सुप्रसिद्ध नृत्यांगना आहे. कुशल सध्या कोणत्याही सिनेमात काम करत नाहीये. सध्यो तो संपूर्णपणे 'चला हवा येऊ द्या'साठीच काम करतोय

English
हिंदी सारांश
Web Title : Kushal Badrike's emotional post for Surekhatai: A heartfelt tribute.

Web Summary : Actor Kushal Badrike penned a touching tribute to Lavani queen Surekha Punekar, praising her dedication and respect earned for Lavani. He acknowledged her struggles and unwavering commitment to her art form.
टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्याटेलिव्हिजन