Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवमाणूस या मालिकेतून दिव्या सिंगची होणार एक्झिट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 19:12 IST

आता या मालिकेला प्रचंड ट्विस्ट अँड टर्न मिळाले आहेत.

ठळक मुद्देअभिनेत्री नेहा खान दिव्या सिंग हे पात्र साकारत होती. तिचं काम प्रेक्षकांना विशेष आवडलंही होतं.

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेची कथा, या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता या मालिकेला प्रचंड ट्विस्ट अँड टर्न मिळाले आहेत.

देवी सिंगला एसीपी दिव्या सिंगने पकडले असून त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी ती प्रयत्न करत आहे. आता तिला वकील आर्या देशमुखचीही साथ मिळाली आहे. त्यामुळे दोघीही शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पण डॉक्टरही आता उलट तपासणी करत दोघींना आव्हान देत आहे. त्यामुळे आता मालिकेत काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पण या सगळ्यात आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  आता एसीपी दिव्या सिंग मालिकेत दिसणार नसून तिच्या जागेवर इन्स्पेक्टर शिंदे येणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहाणे रंजक असणार आहे.

अभिनेत्री नेहा खान दिव्या सिंग हे पात्र साकारत होती. तिचं काम प्रेक्षकांना विशेष आवडलंही होतं. पण आता दिव्या सिंगच्या एक्झिटमुळे खूपच गोष्टी बदलणार आहेत. 

टॅग्स :झी मराठी