Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांचं कोर्ट मॅरेज आधीच झालंय...", करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या नात्याबाबत 'लाफ्टर शेफ' फेम अभिनेत्याचा गौप्यस्फोट? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:55 IST

करण आणि तेजस्वीने आधीच कोर्ट मॅरेज केलंय, अशा चर्चा आता सुरू आहेत. याला कारण ठरलं 'लाफ्टर शेफ'च्या सेटवरील अली गोनीचा एक व्हिडीओ. अली गोनीने 'लाफ्टर शेफ'च्या शूटिंगदरम्यान केलेल्या व्लॉगमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्या लग्नाबद्दल अनेकदा चर्चा रंगताना दिसतात. पण, करण आणि तेजस्वीने आधीच कोर्ट मॅरेज केलंय, अशा चर्चा आता सुरू आहेत. याला कारण ठरलं 'लाफ्टर शेफ'च्या सेटवरील अली गोनीचा एक व्हिडीओ. अली गोनीने 'लाफ्टर शेफ'च्या शूटिंगदरम्यान केलेल्या व्लॉगमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

अलीने त्याच्या युट्यूबवरुन 'लाफ्टर शेफ' शूटिंगचा एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये 'लाफ्टर शेफ'मधील अनेक कलाकार दिसत आहेत. अली गोनी व्हिडीओमध्ये बोलत असताना पाठीमागे अभिषेक कुमारचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणतो, "त्यांनी आधीच कोर्ट मॅरेज केलं आहे". अली गोनीच्या या व्हिडीओमधला अभिषेक कुमारचा आवाज चाहत्यांनी बरोबर ओळखला आहे. ते कपल दुसरं तिसरं कोणी नसून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे. 

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची लव्हस्टोरी 'बिग बॉस १५'मध्ये सुरू झाली होती. या पर्वात ते सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे सूत जुळले. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांनी प्रेमाची कबुली दिली होती. करण आणि तेजस्वी या कपलचा चाहता वर्गही मोठा आहे. चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Karan Kundrra-Tejasswi Prakash secretly court married? 'Laughter Chef' actor's revelation goes viral.

Web Summary : Rumors swirl that Karan Kundrra and Tejasswi Prakash secretly had a court marriage. A video from 'Laughter Chef' set fuels speculation, with Abhishek Kumar's voice hinting at the marriage. The couple's love story began on 'Bigg Boss 15'.
टॅग्स :करण कुंद्रातेजस्वी प्रकाशटिव्ही कलाकार