Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मोठी मोठी नावं आहेत...", बिग बॉस मराठी ६ बद्दल एक्स स्पर्धक अभिजीत सावंतची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:13 IST

बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सीझनमधला आवडता स्पर्धक कोण? अभिजीतने घेतलं 'हे' नाव

इंडियन आयडॉल १ चा विजेता अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये दिसला होता. अभिजीतचा शांत स्वभाव सगळ्यांनाच भावला होता. त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे तो टॉप २ पर्यंत पोचला होता. आता काही दिवसात बिग बॉस मराठीचा सहाना सीझन सुरु होत आहे. या सीझनमध्ये कोण कोण सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे. नुकतीच बिग बॉस मराठीच्या सर्व माजी स्पर्धकांची ग्रँड पार्टी झाली. स्मिता गोंदकरने या पार्टीचं आयोजन केलं होतं. अभिजीत सावंतने आता बिग बॉसच्या सहाव्या सीझनवर प्रतिक्रिया दिली आहे.

बिग बॉस मराठीचे सर्व माजी स्पर्धक नुकतेच भेटले. एकत्र त्यांनी मजा मस्ती केली त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. इट्स मज्जा ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंत म्हणाला, "सगळ्यांना भेटून खूप मजा आली. बिग बॉस करण्याच्या आधी खूप अभ्यास करावा लागतो असं म्हणतात. तसा मीही केला होता. आधीचे सीझन पाहिले होते. ते कसे खेळतात, त्यांचे गेम प्लॅन कसे असतात हे पाहिलं होतं. आज त्या सगळ्यांना भेटून त्यांचे आभारच मानले. शिव ठाकरे माझा आवडीचा होता. मी जास्त शिवचेच एपिसोड पाहिले होते. तो खूप व्यवस्थित राहिला, तोल सांभाळून होता आणि त्याने शो जिंकूनही दाखवला. तो नक्कीच माझ्यासाठी प्रेरणादायी होता."

'बिग बॉस मराठी ६' बद्दल अभिजीत म्हणाला, "या सीझनमध्ये जाणारे बरेचसे लोक मला माहित आहेत. काही लोक मला भेटूनही गेली. मी एवढीच हिंट देऊ शकतो. तुम्हाला लवकरच कळेल. यावेळी खूप चांगले स्पर्धक आहेत. खूप मोठी नावं आहेत त्यामुळे उत्सुकता आहे. मी त्यांना काय सल्ला देऊ? त्यांनी बेस्ट सीझन करावा कारण हा सीझन बऱ्याच अपेक्षा घेऊन येतोय. मागचा आमचा सीझन खूप गाजला  त्यामुळे या सीझनकडूनही खूप अपेक्षा आहेत. सगळे स्पर्धक आपलं मनोरंजन करतील अशी आशा आहे. हा सीझनही चांगला गाजेल. मी कोणाला सपोर्ट करणार हे तुम्हाला शो सुरु झाल्या झाल्या लगेचच कळेल."

English
हिंदी सारांश
Web Title : Abhijeet Sawant on Bigg Boss Marathi 6: 'Big Names This Season'

Web Summary : Ex-Bigg Boss contestant Abhijeet Sawant is excited about the upcoming season, hinting at big names and high expectations after the success of season 5. He wishes the contestants well, hoping they entertain the audience.
टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठी ६कलर्स मराठी