Join us

हिना खान नंतर 'ही' अभिनेत्री साकारणार नवी कोमोलिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 19:00 IST

आलिशा 'इश्क में मरजावां या मालिकेत झळकली होती. आलिशाच्या एंट्रीने कसौटी जिंदगी की मालिकेत नवी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.

आता पर्यंत अनेक टीव्ही अभिनेत्रींनी छोटा पडदा गाजवल्यानंतर  बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवल्याचे अनेक उदाहरणं आहेत. याच यादीत अजून एका टीव्ही अभिनेत्रीची भर पडणार आहे ती म्हणजे हिना खानची. सध्या हिना कोमोलिका बनत रसिकांच्या मनोंरजन करत आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत ती कोमोलिका ही भूमिका साकारत आहे. छोटा पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली हिना खानला रूपेरी पडद्यावर एंट्री मारण्याची इच्छा होते. त्यानुसार लवकरच ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. सिनेमासाठी तिने कसौटी जिंदगी की ही मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. 'कोमोलिका'च्या भूमिकेसाठी मालिकेच्या टीमचा शोध सुरू होता नवीन कोमोलिका कोण असणार याची सा-यांना उत्सुकता होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. लवकरच नवी कोमोलिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.  आलिशा पवार  हिना नंतर कोमोलिका भूमिका साकारणार आहे. आलिशा  'इश्क में मरजावां या मालिकेत झळकली होती.  आलिशाच्या एंट्रीने कसौटी जिंदगी की मालिकेत नवी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.  

 सिनेमाची ऑफर हिनाला  मिळाली असल्याचे बोलले जात आहे.लवकरच  शूटिंग सुरु होणार असून ती कोणासोबत स्क्रीन शेअर करणार त्या अभिनेत्याचे नाव अजून समोर आलेलं नाही. कोमोलिकाच्या भूमिकेसाठी मालिकेच्या टीमचा शोध सुरू होता नवीन कोमोलिका कोण असणार याची सा-यांना उत्सुकता होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. लवकरच नवी कोमोलिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.  आलिशा पवार  हिना नंतर कोमोलिका भूमिका साकारणार आहे. आलिशा 'इश्क में मरजावां या मालिकेत झळकली होती.  आलिशाच्या एंट्रीने 'कसौटी जिंदगी की' मालिकेत नवी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे.