Join us
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी! 'आई तुळजाभवानी'ची गाथा अनुभवायला मिळणार, प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 11:22 IST

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची गाथा प्रेक्षकांना मराठी मालिकेत अनुभवायला मिळणार आहे

बिग बॉस मराठीची उत्सुकता शिगेला आहे. कालच बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड प्रिमियर झाला. यावेळी घरात एकूण १६ स्पर्धकांची एन्ट्री झाली. बिग बॉसची चर्चा असतानाच कलर्स मराठीने एका नव्या मालिकेची घोषणा केली. ही मालिका पौराणिक असणार आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजाभवानीची गाथा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. कलर्स मराठीने काल नव्या मालिकेची शानदार घोषणा केलीय.

आई तुळजाभवानीच्या गाथेचा अनुभव मिळणार

कलर्स मराठीने काल एक प्रोमो रिलीज केला. या प्रोमोत दिसतं की मंदिरात छत्रपती शिवरायांना आई तुळजाभवानी स्वराज्य रक्षिण्यासाठी तळपती तलवार भेट म्हणून देते. शिवराय तुळजाभवानीचा आशिर्वाद घेतात. पुढे आई तुळजाभवानी मालिकेचं नाव दिसतं. या मालिकेची रिलीज डेट अजून उघड झाली नाही. तरीही लवकरच ही मालिका कलर्स मराठीवर सुरु होईल अशी शक्यता दिसत आहे.

पहिल्याच प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

'आई तुळजाभवानी' मालिकेच्या पहिल्याच प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी मालिका पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची गाथा छोट्या पडद्यावर कशी भव्यदिव्य दिसणार याची सर्वांना उत्सुकता आहे.  'आई तुळजाभवानी' मालिकेच्या रिलीज डेटचा अद्याप खुलासा झालेला नाही. याशिवाय मालिकेत कोणते कलाकार झळकणार हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रतुळजापूरछत्रपती शिवाजी महाराज