Join us  

अरुंधतीने घेतला 'मोकळा श्वास'; व्हिडीओ पाहून प्रेक्षकांच्याही चेहऱ्यावर पसरला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 6:40 PM

Madhurani gokhale-prabhulkar: सोशल मीडियावर सक्रीय असणारी मधुराणी अनेकदा 'आई कुठे काय करते' या मालिकेविषयी, अरुंधतीविषयी लिहित असते. यात बऱ्याचदा ती तिची मत मांडत असते. परंतु, यावेळी तिने अरुंधतीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). या मालिकेत मधुराणीने अरुंधती ही भूमिका साकारली आहे. देशमुखांच्या एकत्र कुटुंबातील मोठी सून, गृहिणी, आई, पत्नी अशा विविध भूमिका पार पाडणारी ही अरुंधती अल्पावधीत लोकप्रिय झाली. तिच्यातील संयम, शांतपणा, प्रत्येकाला समजून घेण्याची क्षमता यामुळे तिच्यावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. विशेष म्हणजे ही भूमिका उत्तमरित्या साकारल्यामुळे मधुराणीवरही कायमच कौतुकाचा वर्षाव होत असतो. विशेष म्हणजे मालिकेतील अरुंधती खऱ्या आयुष्यातही प्रेक्षकांसोबत जोडली जावी यासाठी मधुराणी कायम अरुंधतीविषयी काही पोस्ट शेअर करत असते. यामध्येच तिने पुन्हा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी मधुराणी अनेकदा 'आई कुठे काय करते' या मालिकेविषयी, त्यातील पात्रांविषयी आणि खासकरुन अरुंधतीविषयी लिहित असते. यात बऱ्याचदा ती तिची मत मांडत असते. परंतु, यावेळी तिने अरुंधतीचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अरुंधती आता सगळ्या जबाबदाऱ्यांमधून, टेन्शनमधून मुक्त झालीये आणि ती मोकळा श्वास घेतीये असं वाटतंय. हा व्हिडीओ शेअर करत ख्वाबोके परिंदे......!असं कॅप्शन मधुराणीने दिलं आहे. 

दरम्यान, शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरुंधती मुक्तपणे कबुतरांच्या मागे धावतांना दिसत आहे. या कबुतरांचा थवा उडाल्यानंतर ती खळखळून हसते. सध्या आई कुठे काय करते या मालिकेत नुकतंच अभि आणि अनघाचं लग्न झालं आहे. त्यामुळे आता अरुंधती हे घर सोडून तिच्या पुढील आयुष्याकडे वळणार आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता अरुंधतीच्या पुढील प्रवासामधील तो भाग आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार