'आई कुठे काय करते' ही मराठी टेलिव्हिजनवरील गाजलेली मालिका. या मालिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. मालिकेतील अरुंधतीसोबत इतर पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारून अभिनेता निरंजन कुलकर्णी घराघरात पोहोचला. निरंजनने नुकतंच लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर निरंजन हनिमूनसाठी बायकोला घेऊन मालदीव्सला पोहोचला आहे.
निरंजन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. सध्या निरंजन त्याच्या पत्नीसोबत मालदीव्समध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय. त्याने मालदीव ट्रीपचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत निरंजनने मालदीव्समधील त्याच्या रुमची झलक आणि समुद्रकिनारा दाखवला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
निरंजनने मे महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकत मनिषा हिच्यासोबत संसार थाटला. सोशल मीडियावरुन त्याने लग्नाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्याने डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. 'आई कुठे काय करते'मधून निरंजनला प्रसिद्धी मिळाली. त्याचा स्वत:चा फूड व्यवसायही आहे.