Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?" आदिश वैद्यच्या 'त्या' पोस्टवर चाहतीची कमेंट, भडकला अभिनेता, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:13 IST

रेवतीचा एक्स बॉयफ्रेंड आदिश वैद्यच्या पोस्टमुळे चर्चा रंगली आहे. आदिशने शेअर केलेल्या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली आहे. ज्यामुळे आदिश भडकला आहे. 

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेवती लेले नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. रेवतीने कौशिक भिडेसोबत २० फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. रेवतीने तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. मात्र आता रेवतीचा एक्स बॉयफ्रेंड आदिश वैद्यच्या पोस्टमुळे चर्चा रंगली आहे. आदिशने शेअर केलेल्या पोस्टवर एका चाहतीने कमेंट केली आहे. ज्यामुळे आदिश भडकला आहे. 

आदिश वैद्यने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये आदिच्या हातासोबत एक दुसरा मुलीचा हात दिसत आहे. पण दुसऱ्या फोटोमध्ये हा हात आदिशचाच असल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करत आदिशने पोस्ट लिहिली आहे. "मेरे हाथ मे, मेरा हाथ हो...सारी जन्नते मेरे साथ हो", असं कॅप्शन आदिशने या पोस्टला दिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यातील एका चाहतीची कमेंट पाहून अभिनेता भडकला आहे. 

आदिशच्या या फोटोवर कमेंट करत त्या चाहतीने "तू रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?" असा प्रश्न विचारला आहे. चाहतीची ही कमेंट पाहून आदिश भडकला. तिच्या कमेंटवर रिप्लाय करत तो म्हणाला, "असा मूर्खासारखा प्रश्न तुम्ही का विचारत आहात? मी कोणाची खिल्ली उडवलेली नाही. हा जोक मी माझ्यावर केलेला आहे. तिला प्रेम मिळालं यासाठी मी आनंदी आहे. आणि ज्याला कोणाला आयुष्यात प्रेम मिळालं त्या सगळ्यांसाठी मी आनंदी आहे. पुढच्या वेळेपासून बोलण्याआधी विचार करा". 

आदिश आणि रेवती काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी जाहीररित्या त्यांच्या नात्याची कबुलीही दिली होती. मात्र नंतर काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता रेवतीने लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Adish Vaidya lashes out at fan over Revati's wedding post.

Web Summary : Actress Revati Lele recently married. Her ex-boyfriend Adish Vaidya posted photos, leading to fan speculation he mocked the wedding. Adish denied this, clarifying it was a self-deprecating joke and he is happy for her.
टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेता