लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये सध्या लग्नाचं वातावरण आहे. राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब एकत्र येऊन लग्नसोहळ्याचा आनंद घेत आहेत. आधिरा आणि स्वानंदीच्या चूडा विधीमुळे सगळीकडे सेलिब्रशनचा उत्साह आहे. मात्र, या आनंदात एक अनपेक्षित वळण येणार आहे, ज्यामुळे सर्वजण चकीत होणार आहेत.
स्वानंदीच्या चूडा सोहळ्यात सोन्याच्या बांगड्यांच्या जागी बेंटेक्सच्या बांगड्या येतात. तिच्या हातात सोन्याऐवजी बेंटेक्सच्या बांगड्या चढवल्या जातात. सध्यातरी ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाहीये. या घटनेमागे कोणाचा हात आहे, हा प्रश्न सर्वांना विचारात टाकणारा ठरणार आहे. दरम्यान, राजवाडे कुटुंबातही एक वेगळीच अडचण उभी राहते. आधिराच्या चूडा विधीमध्ये अचानक घडलेल्या या अपघातामुळे समारंभातील वातावरण बदलतं. आनंदी वातावरणात अचानक आलेला हा अपशकुन कुटुंबासाठी धक्कादायक ठरणार आहे. या प्रसंगानंतर समर समोर दोन्ही कुटुंबांमधील परिस्थिती शांत करण्याचं एक मोठ आव्हान उभं आहे. आता या घटनेमागील सत्य उलगडत असताना अनेक नाती परिक्षेत उतरतात.
'वीण दोघांतली ही तुटेना' पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना भावनांचा आणि कौटुंबिक नात्यांच्या सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर उघड होणारं सत्य कोणते असेल आणि या घटनांनंतर नात्यांची वीण पुन्हा जुळेल का ? हे जाणून घेण्यासाठी महाविवाह सोहळा पाहावा लागेल.
Web Summary : The Rajwade and Sarpotdar families celebrate a wedding in 'Veen Doghantali Hi Tutena'. Swanandi's bangle ceremony faces a twist with fake jewelry. An accident during Aadhira's ceremony shocks all. Samarth faces the challenge of calming both families as relationships are tested.
Web Summary : 'वीन दोघांतली ही तुटेना' में राजवाडे और सरपोतदार परिवार शादी का जश्न मनाते हैं। स्वानंदी की चूड़ी रस्म नकली गहनों के साथ एक मोड़ का सामना करती है। आधिरा के समारोह के दौरान एक दुर्घटना सभी को चौंका देती है। समर को रिश्तों की परीक्षा में दोनों परिवारों को शांत करने की चुनौती का सामना करना पड़ता है।