Join us

'सुंदरी' मालिकेत नवं वळण, सुंदरी आणि आदित्यमध्ये बहरतय प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:15 IST

Sundari Serial : सन मराठीवरील गाजलेल्या मलिकांपैकी एक सुंदरी ही मालिका आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबली आहे.

सन मराठीवरील गाजलेल्या मलिकांपैकी एक सुंदरी (Sundari Serial) ही मालिका आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबली आहे. सुंदरी ही नेहमीच मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी एक प्रेरणा ठरली असून तिचा कलेक्टर होण्याचा खडतर प्रवास या गोष्टीत आपण पहिलाच असेल. सुंदरीचा कलेक्टर होण्यासाठी खूप छोट्या मोठ्या संकटाना सामोरे जावे लागले होते तिचा हा खडतर प्रवास तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचविणारा होता. अथक परिश्रम केल्यानंतर सुंदरीने शेवटी आपले स्वप्न सत्यात उतरवली आहेत.

सुंदरीला वैवाहिक जीवनात सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते,खरतर एक स्त्रीचा आयुष्यात नवऱ्याचे किती महत्व असते ते आपण पाहत आलोय, त्यात नवऱ्याच प्रेम मिळणं हे देखील तितकेच महत्वाचे आहे तसंच काहीसं सुंदरीच्या बाबतीत होत आहे, तिच्या आयुष्यात एक उणीव कायमची राहिली ती म्हणजे नवऱ्याची तिला कधीच नवऱ्याच सुख मिळाले नाही, सुंदरीने नवऱ्याचे प्रेम मिळवण्यासाठी धडपड केली असता ते तिला कधीच निष्पन्न झाले नाही पण आता ही मालिका एका वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबली आहे.

 सुंदारीचा नवरा आदित्य ज्याने नेहमी तिच्यावर अत्याचार केले, तिला त्रास दिला, सुंदरीला आदित्यचे प्रेम कधी अनुभवयाला मिळाले नाही आता येथे आपल्याला आदित्यची एक वेगळी छवी पाहायला मिळते आहे. आदित्य आता सकारात्मक भावनेने सुंदरीच्या आयुष्यात आला असून त्याची सुंदरी प्रती असलेली नकारात्मक वृत्ती आता सकारात्मक वृत्तीमध्ये परिवर्तित झाली असून, त्या दोघांचे प्रेम आता मालिकेत उमलून येत आहे. सुंदरीच्या नवऱ्याने म्हणजेच आदित्यने त्याच्या प्रेमाची कबुली सुंदरी समोर केली आहे. येत्या रविवारी सुंदरी या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सुंदरी आदित्यवर असलेलं तिचं प्रेम कबुल  करणार आहे..यासाठी तिने आदित्यसाठी सरप्राइज प्लॅन केले आहे. या दोघांचे प्रेम कसे बहरणार हे  पाहणे कमालीचे ठरणार आहे.