Join us

प्रेमकथेवर आधारीत नवीन मालिका 'प्रेमास रंग यावे', या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 19:59 IST

डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंबची नवीन मालिका सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रेमास रंग यावे असे या मालिकेचं नाव आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंबची नवीन मालिका सन मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. प्रेमास रंग यावे असे या मालिकेचं नाव आहे. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नेमकं कशावर प्रेम करतो? त्या व्यक्तीच्या रंग-रूपावर, श्रीमंतीवर, की त्या व्यक्तीच्या चांगुलपणावर, त्याच्या सुंदर मनावर? सन मराठीवरील २० फेब्रुवारीपासून, सोमवार ते शनिवार रात्री ९.३०वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली प्रेमास रंग यावे ही मालिका नेमकी ह्याच प्रश्नाभोवती फिरते. 

ही गोष्ट आहे एका अत्यंत हुशार, सालस, सहृदयी अक्षराची आणि एका चांगल्या मनाच्या पण खुशालचेंडू, न्यूनगंडाने भरलेल्या आणि पारंपरिक अर्थाने देखणा नसलेल्या सुंदरची. या मालिकेत मनमिळाऊ आणि सगळ्यांना आपलंसं करणाऱ्या 'अक्षरा' या मुख्य पात्राच्या भूमिकेत अभिनेत्री अमिता कुलकर्णी असून निर्मळ मनाच्या पण शून्य व्यवहारज्ञान असलेल्या सुंदरची भूमिका सादर करणार आहे अभिनेता रोहित शिवलकर.

या सोबतच समीरा गुजर- जोशी, अभिजित चव्हाण, सारिका नवाथे, मोनिका दाभाडे, संजीव तांडेल,किरण डांगे, सचिन माने, गौरी कुलकर्णी, विद्या संत असे अनेक कलाकार मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची निर्मिती  डॉ.अमोल कोल्हे यांची जगदंब ही निर्मिती संस्था करत असून मालिकेचे दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड ह्यांनी केले आहे.

टॅग्स :डॉ अमोल कोल्हे