Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जाऊ बाई गावात'मध्ये आला नवा पाहुणा, घेऊन स्पर्धकांसाठी पहिले कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:39 IST

Jau Bai Gavat : 'जाऊ बाई गावात' खेळ नुकताच सुरू झाला आणि सर्वात पहिले गावात जाण्याचा मान मिळवणाऱ्या मुक्ताच्या संयमचा बांध ही तुटला. ऐशोआरामाच राहणं सोडून आलेल्या ह्या मुली गावच्या वातावरणात राहण्याच्या कसोटीवर कशा उभ्या राहणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) खेळ नुकताच सुरू झाला आणि सर्वात पहिले गावात जाण्याचा मान मिळवणाऱ्या मुक्ताचा संयमचा बांध ही तुटला. ऐशोआरामाच राहणं सोडून आलेल्या ह्या मुली गावच्या वातावरणात राहण्याच्या कसोटीवर कशा उभ्या राहणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. आता या शोमध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे. तसेच ती स्पर्धकांसाठी नवा टास्क घेऊन आली आहे. 

जाऊ बाई गावातची स्पर्धक मुक्ताने गावातल्या आजीवर तर आवाज चढवला पण तिला तिची चुक सांगत असताना कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक हार्दिक जोशीसोबतही ती उद्धटपणे वागली. ही तर सुरूवात आहे, कारण प्रत्येक नवीन दिवस ह्या स्पर्धकांसाठी कसोटीचा असणार आहे, कारण आता सर्व स्पर्धकांची वाट पाहत आहेत गावच्या कोंबड्या. हे खास कार्य घेऊन आली आहे क्रांती रेडकर जिचं कोंबड्याशी जुने नाते आहे. हे स्पर्धक ह्या कार्यामध्ये यश मिळवू शकतील? मुक्ताच्या उद्धट पणाचा दुसऱ्या स्पर्धकांना त्रास भोगावा लागेल?  की मुक्ता खेळाचं मैदान खेळ सुरु होण्याआधीच सोडून जाईल? 

'जाऊ बाई गावात' हा नवा शो प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आहे. यासोबतच जेव्हा हे स्पर्धक एक गावकरी बनून कार्य करणार ते पाहायला मजादेखील येणार आहे. मनोरंजनाची ही रंगतदार आतिषबाजी ‘जाऊ बाई गावात' सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर पाहायला मिळेल.

टॅग्स :हार्दिक जोशीक्रांती रेडकर