Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक ‘गायब’ झालेत टीव्हीचे हे चार लोकप्रिय चेहरे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 08:00 IST

कुठे आहेत हे कलाकार ?

ठळक मुद्देक्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत कामिनी खन्नाची भूमिका साकारणारी रीवा बब्बर सध्या अज्ञातवासात आयुष्य जगतेय.

अनेक टीव्ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकांमधील व्यक्तिरेखा आणि या व्यक्तिरेखा साकारणा-या कलाकारांना म्हणून आजही लोक विसरू शकलेले नाही. टीव्हीवरचे अनेक कलाकार मालिकांमुळे प्रचंड लोकप्रिय झालेत. पण यापैकी काही जण आज लाईमलाइटपासून दूर अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत. अशाच काही कलाकारांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सीजेन खान

‘कसौटी जिंदगी के’मधील अनुराग बासूची भूमिका प्रचंड गाजली होती. अनुराग आणि प्रेरणाच्या जोडीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. यात अभिनेता सीजेन खान याने अनुरागची भूमिका साकारली होती. यानंतर क्या हादसा क्या हकीकत, पिया के घर जाना है, एक लडकी अंजानी सी, सीता और गीता अशा अनेक मालिकांमध्ये तो दिसला. 2009 मध्ये सीता और गीता ही मालिका प्रदर्शित झाली होती. तेव्हापासून सीजेन खान लाइमलाईटपासून दूर आहे.

पुनम नरूला

‘इतिहास’ या मालिकेमधून पुनम नरूला घराघरात पोहोचली. यानंतर कसौटी जिंदगी की, कुटुंब, कुसूम, कहीं किसी रोज आणि शरारत या मालिकेत ती दिसली. ‘नच बलिए’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून ती अखेरची झळकली. 2005 मध्ये आलेल्या या शोनंतर पूनम नरूला टीव्हीवरून अचानक गायब झाली.

किरण करमरकर

कहाणी घर घर की मालिकेत ओमची भूमिका साकारणारा किरण करमरकर टीव्हीवरचा एक चर्चित चेहरा होता. या मालिकेत किरणने पार्वती अर्थात साक्षी तंवरच्या पतीची भूमिका साकारली होती. यानंतर तो अनेक मालिकांमध्ये दिसला. 2017 मध्ये ‘रूद्र’ ही त्याची अखेरची मालिका. तेव्हापासून तो टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे.

रीवा बब्बर

क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेत कामिनी खन्नाची भूमिका साकारणारी रीवा बब्बर सध्या अज्ञातवासात आयुष्य जगतेय. 2015 मध्ये आलेल्या ‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकेत ती अखेरची झळकली होती.

टॅग्स :टेलिव्हिजन