Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘खल्लास गर्ल’ बनणार शिक्षिका

By admin | Updated: September 24, 2016 02:00 IST

‘ख ल्लास’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इशा कोपीकर आता शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘ख ल्लास’ गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री इशा कोपीकर आता शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. लव, ब्रेक-अप आणि मैत्री यावर हा सिनेमा आधारित असेल. या सिनेमात इशा कोपीकरसह महेश मांजरेकर यांचा पुत्र सत्या मांजरेकर आणि ‘सैराट फेम परश्या’ आकाश ठोसरसुद्धा झळकणार आहे. इशा कोपीकर आणि सत्या मांजरेकर यांच्यावर एक हटके लव सीनसुद्धा या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सत्या, आकाश यांच्यासह मयूरेश पेम, शुभम तिरोडियन हे चौघे सिनेमात धम्माल करताना दिसणार आहे. याशिवाय वैदेही परशुरामी, संस्कृती बालगुडे यांच्याही या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू असून २०१७मध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.