Join us

Ganesh Festival 2018 : तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 10:31 IST

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवलकरच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून त्यामुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीप्रमाणेच ही सोसायटी हुबेहुब दिसत आहे. या आगळ्यावेगळ्या डेकोरेशनविषयी मंदार सांगतो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं पूर्ण झाले आणि मी देखील गेल्या १० वर्षांपासून घरात गणपती बाप्पाला आणत आहे. माझ्या आयुष्यात गणरायाला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळेच मी यंदाचे डेकोरेशन थोडेसे वेगळे केले आहे. यासाठी मला माझ्या मालिकेचे सेट डिझाइन करणाऱ्या व्यक्तीनेच मदत केली. 

हा सेट बनवण्यासाठी मंदारची पत्नी स्नेहल शॉपिंगला गेली असताना तिला एक खूप छान अनुभव आला. याविषयी ती सांगते, भिडेची स्कूटर ही त्याची ओळख आहे. त्यामुळे या सेटवर आम्ही ती स्कूटर देखील ठेवली आहे. ही स्कूटर विकत घेण्यासाठी मी एका दुकानात गेले होते. त्यावेळी मी दुकानदाराला काही स्कूटर दाखवायला सांगितल्या... तर तो मला साध्या स्कूटर दाखवत होता. त्यावर मला साईट कारवाली स्कूटर हवी आहे असे मी त्याला सांगितले तर त्याने तुम्हाला सखाराम हवा आहे का असा प्रतिप्रश्न मला विचारला. यावरून या मालिकेच्या व्यक्तिरेखाच नव्हे तर या मालिकेतील छोट्या छोट्या गोष्टी देखील किती प्रसिद्ध आहेत याची मला प्रचिती आली.

मंदारच्या गणरायाच्या सेटसोबतच त्याच्या गणपती बाप्पाच्या विर्सजनाचे देखील एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या घरातील मूर्ती ही नेहमी शाडूची असते. तो दरवर्षी गणरायाचे विसर्जन एका भल्या मोठ्या भांड्यात करतो आणि त्यानंतर ते पाणी सोसायटीतील झाडांना घालतो. अशाप्रकारे पर्यावरणाचे प्रदूषण न करता तो गणेशोत्सव साजरा करतो. 

 

टॅग्स :मंदार चांदवडकरतारक मेहता का उल्‍टा चश्‍मागणेश चतुर्थी २०१८