Join us

तन्वीचे बाइक वेड

By admin | Updated: November 25, 2015 02:20 IST

आपल्याकडे आजही बऱ्याचदा मुलींनी बाइक चालविणे या गोष्टीकडे आश्चर्याने पाहिले जाते. त्यातही अ‍ॅव्हेंजर, बुलेट किंवा स्पोटर््स बाइक चालवताना मुलगी दिसली,

आपल्याकडे आजही बऱ्याचदा मुलींनी बाइक चालविणे या गोष्टीकडे आश्चर्याने पाहिले जाते. त्यातही अ‍ॅव्हेंजर, बुलेट किंवा स्पोटर््स बाइक चालवताना मुलगी दिसली, की आ वासून तिच्याकडे बघितले जाते. पण, काही मुलींसाठी बाइक चालवणे, रायडिंग करणे हे एक प्रकारचे पॅशन असते. अशाच काही मुलींमध्ये त्यापेक्षाही अभिनेत्रींमध्ये असं म्हणायला लागेल... तर अशाच काही अभिनेत्रींमध्ये बायकरवेड्या अभिनेत्रीचं नाव घ्यायला लागेल... ते म्हणजे तन्वी किशोर. हिला तुम्ही गेल्या महिन्यातच प्रदर्शित झालेल्या ‘बायकर्स अड्डा’ या चित्रपटात सेकंड लीड रोलमध्ये पाहिलंतही. पण, लोकहो... ती केवळ चित्रपटातच बायकर म्हणून नाही दाखवलीय बरं. ती तिच्या खऱ्या आयुष्यातही साहसी बायकिंग करते. तन्वी तिच्या या साहसी खेळाच्या वेडाबद्दल सांगते, ‘मी खऱ्या आयुष्यातही एक बायकर आहे आणि मला मोटरसायकल फास्ट स्पीडमध्ये चालवायला प्रचंड आवडते. बुलेट क्लासिक ३०० आणि थंडरबर्ड ५०० वर रायडिंग करायची तर मला क्रेझ आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्याशी रिलेटेड सगळे स्टंट्स मी स्वत: केले आहेत. तेव्हा तर मला एका शॉटला पडल्यावर लागलंही होतं. त्या वेळेस मला काही काळ शूटिंगपासून लांबही ठेवण्यात आलं होतं. पण, माझ्यासाठी तो फारच थ्रिलिंग एक्सपिरीअन्स होता.’