Join us
Daily Top 2Weekly Top 5

'इमरान हाश्मी मला भावासारखाच' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या तनुश्री दत्ताचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 16:03 IST

माझ्याच सीन्सवर का इतकी चर्चा होते? तनुश्रीने मांडलं मत

सतत काही ना काही वादग्रस्त विधाने करत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताचं (Tanushree Dutta) आणखी एक वक्तव्य सध्या गाजतंय. तनुश्री आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचे 'आशिक बनाया आपने' सिनेमातील इंटिमेट सीन्स खूपच व्हायरल होतात. त्यावर जेव्हा तनुश्रीला प्रतिक्रिया विचारली गेली तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने सर्वच आश्चर्यचकित झालेत. इमरान हाश्मी मला भावासारखाच असं तिने म्हटलं आहे. नक्की काय म्हणाली तनुश्री वाचा.

'फिल्मीग्यान'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली,'अनेक टॉपमोस्ट अभिनेत्रींनी आतापर्यंत सिनेमात किसींग सीन्स, इंटिमेट सीन्स दिले आहेत.  मग माझ्याच सीन्सवर का इतकी चर्चा होते. माझ्यामुळेच काय प्रॉब्लेम होतो. मी काहीही केलं शॉर्ट स्कर्ट घातला तर प्रॉब्लेम कोणता सीन करु प्रॉब्लेम. अभिनय आहे भाई त्यात आमचं वैयक्तिक असं काही नाहीए.'

ती पुढे म्हणाली, 'माझं आणि इमरानचं त्यात काहीच वैयक्तिक नव्हतं. माझी आणि इमरान हाश्मीची केमिस्ट्री म्हणजे भावाबहिणीसारखी आहे. खरंच आमच्यात तसंच नातं आहे.'

तनुश्रीच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. 'असं बोलून भावा बहिणीचं नातं खराब करु नको','भावासोबत कोण असे सीन्स करतं?' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तनुश्रीने मध्यंतरी नाना पाटेकर आणि राखी सावंत यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यामुळेही ती चर्चेत आली होती.

टॅग्स :तनुश्री दत्ताबॉलिवूडइमरान हाश्मी